आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन सुनील पालच्या पत्नीची सिक्युरिटी गार्ड्सने काढली छेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः कॉमेडियन सुनील पाल पत्नी सरितासोबत - Divya Marathi
फाइल फोटोः कॉमेडियन सुनील पाल पत्नी सरितासोबत

मुंबईः सांताक्रूज येथील लीडो या हाय प्रोफाइल सोसायटीत वास्तव्याला असलेल्या विनोदवीर सुनील पालच्या पत्नीसोबत येथील सिक्युरिटी गार्ड्सनी छेडछाड केल्याची घटना उघड झाली आहे. सरिता पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी त्यांनी सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी स्थानिक प्रकरण असल्याचे सांगून आपापसांत प्रकरण मिटवण्यास सांगितले. या सोसायटीमध्ये सुनील पाल पत्नी सरिता आणि दोन मुलांसोबत 2007 पासून वास्तव्याला आहे. सुनील पालचे गेल्या काही दिवसांपासून या सोसायटीच्या बिल्डरसोबत शेअर सर्टिफिकेटवरुन वाद सुरु आहे. शेअर सर्टिफिकेट नसल्यामुळे सोसायटीचे सेक्रेटरी त्याच्याकडून सोसायटी मेंटेनन्स घेत नाहीत. सेक्रेटरीने त्याला बिल्डरकडून एनओसी आणण्यास सांगितले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
सरिता पाल यांनी सांगितले, सोमवारी जेव्हा त्या आपल्या मुलाला शाळेतून कारने घरी परत आणत होत्या, तेव्हा गार्ड्सनी गेट उघडण्यास नकार दिला. सरिता यांनी गेट उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेथील गार्ड्सनी त्यांच्यासोबत छेडछाड केली. सुनील सध्या मुंबईतून बाहेर आहे. त्यामुळे त्यांनी 100 नंबर डायल करुन पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. दोन पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले. मात्र त्यांनी सरिताची तक्रार दाखल करुन घेतली नाही. सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा त्यांनी सल्ला दिला. सरिता यांनी सांगितले, की आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आता पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहे सुनील पाल
सुनील पाल कॉमेडियन आहे. 2005 मध्ये 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा शो जिंकल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. सुनीलचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगनघाट येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. पाल हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असून भावनाओं को समझो या सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, संबंधित छायाचित्रे...