मुंबई- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात छेडछाड आणि हाथापाई केल्याची तक्रार दाखल झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (17 जानेवारी) मुंबईच्या यारी रोडवर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये पार्किंगमुळे नवाजुद्दीनचे एका तरुणीसोबत भांडण झाले. अद्याप नवाजुद्दीनकडून या प्रकरणात कोणतेच स्पष्टीकरण आलेले नाहीये.
काय आहे प्रकरण?
- अपार्टमेंटच्या ग्राऊंड फ्लोरवर असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये नवाजने बेकायदेशीर बांधकाम केले आहे.
- त्यामुळे कार पार्किंगमध्ये अडचण येत आहे. या प्रकरणात सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीने नवाजला नोटीससुध्दा पाठवली आहे.
कुणी दाखल केली तक्रार?
- नवाजच्या विरोधात तक्रार दाखल करणारी 24 वर्षीय तरुणी सोसायटीच्या सेक्रेटरीची मुलगी आहे.
- ती नवाजला सोसायटीच्या मीटींगविषयी सांगायला गेली होती.
- आरोप आहे, की नवाजने तिला शिवीगाळ करून हाथापाई केली. या घटनेनंतर सोसायटीचे लोक पोलिस ठाण्यात गेले.
'लंचबॉक्स'साठी मिळाला होता फिल्मफेअर पुरस्कार...
- 'तलाश', 'कहानी', 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि 'देख इंडियन सर्कस' सिनेमांसाठी नवाजुद्दीनला 2012मध्ये राष्ट्रीय पुरस्कारात स्पेशल ज्यूरी अवॉर्डने गौरवण्यात आले होते.
- 2013मध्ये रिलीज झालेल्या 'लंच बॉक्स' सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
अनेक हिट सिनेमांत केले आहे काम...
- नवाजुद्दीनचा मागील वर्षी अभिनेता सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.
- 'मांझी द माउंटेन मॅन', 'बदलापूर', 'किक', 'गँग्स ऑफ वासेपुर'सारखे अनेक हिट सिनेमांतून त्याला ओळख मिळाली आहे.
- सध्या तो कोलकात्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'तीन' सिनेमाचे शूटिंग करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्विक करून पाहा FIRची प्रत...