आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक अभिजीतने उघडलेले नवे ट्विटर अकाऊंटही काही तासांत सस्पेंड, वाचा काय म्हणाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वादग्रस्त गायक अभिजीतचे नवीन अकाऊंटही ट्विटरने लगेचच सस्पेंड केले आहे. जवळपास आठवडाभरापूर्वी अभद्र भाषेचा वापर केल्याने अभिजीतचे ट्विट अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी अभिजीत नवीन अकाऊंटसह ट्विटरवर परतला. हे अनव्हेरीफाइड अकाउंट होते. पण काही तासांतच ट्विटरने त्याचे हे अकाऊंटही सस्पेंड केले. 

सोमवारी अभिजीतने नव्याने उघडलेल्या ट्विटर अकाऊंटवरही, ते अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याचा मॅसेजच दिसत होता. नवीन अकाऊंटवर त्याने एक व्हिडीओदेखिल शेयर केला होता. त्यात अभिजीत म्हणत होता, लोक माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक भारताच्या आणि भारतीय लष्कराच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाय विरोधात मी आहे.
 
जोपर्यंत माझे व्हेरीफाइड अकाऊंट सुरू करण्यात येत नाही, तोपर्यंत मला या ट्विटर अकाऊंटवर फॉलो करा. माझ्या नावाचे इतर सर्व अकाऊंटस खोटे असून माजी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जात आहे. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. मी परत आलो आहे. देशविरोधी बोलणाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांचा विरोध मी करणारच, असे अभिजीतने पोस्ट केले.  
 
अभिजीत का म्हणाला, ट्विटरवर असणे आहे गरजेचे.. वाचा पुढील स्लाइडवर..
 
बातम्या आणखी आहेत...