आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Statements Of Shotgun, Shatrughan Sinha About Amitabh

खामोश..अमिताभमुळे सोडले अनेक चित्रपट, आत्मचरित्रात शॉटगनचे खळबळजनक खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचा फाइल फोटो. उजवीकडे आत्मचरित्राचे उद्घाटन. - Divya Marathi
शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचा फाइल फोटो. उजवीकडे आत्मचरित्राचे उद्घाटन.
बॉलीवूडचा महानायक म्हणून सर्वपरिचित असणारे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा मान दिला जातो. मात्र बिग बींचे त्यांच्या अनेक समकालीन सहकलाकारांबरोबर वाद असल्याचेही आपण बरेचदा ऐकले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबतही असेच काही असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या आगामी आत्मचरित्रामध्येही असे काही वादग्रस्त मुद्दे मांडल्याचे समोर आले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'एनिथिंग बट खामोश' नावाच्या आत्मचरित्रामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबाबत विविध वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या ओम बूक पब्लिशर्स यांनी पुस्तक प्रकाशनाच्या काही तासांपूर्वी फेसबूकवर हे वादग्रस्त वक्तव्ये टाकले आहेत. त्यामुळे पुस्तक प्रकाशनापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे.

भारती एस. प्रधान यांनी हे पुस्तक लिहिलेले असून काँग्रेस नेते शशी थरूर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. नवी दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवाणींसारख्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
पाहुयात शत्रुघ्न सिन्हा यांनी आत्मचरित्रात केलेली वादग्रस्त वक्तव्ये...