आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO पुन्हा वादात अडकला स्वामी ओम, बिकिनी गर्लबरोबर अश्लिल व्हिडीओमुळे चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बिग बॉस या रियालिटी शोमधील आतापर्यंतचा सर्वात वादग्रस्त चेहरा म्हणून समोर आलेला स्वामी ओम पुन्हा एकदा वादात अडकला आहे. स्वामी ओमचे वादात अडकण्याचे यावेळचे कारण म्हणजे त्याचा समोर आलेला एक वादग्रस्त व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये स्वामी ओम एका बिकिनी गर्लबरोबर दिसत आहे. 

आगामी चित्रपटाचा व्हिडीओ
स्वामी ओमच्या आगामी मन का मैल चित्रपटाचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये बिकिनी परिधान केलेली एक मॉडेल स्वामी ओमसमोर डान्स करताना दिसत आहे, तर स्वामी ओम तिच्यासमोर डोळे बंद करून तपश्चर्येला बसल्यासारखे दिसत आहे. स्वामीसमोर डान्स करणारी मॉडेल अत्यंत तोकड्या कपड्यात दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरातील कृत्ये आणि गैरवर्तनामुळे स्वामी ओमला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. सलमान खानबरोबरही त्याचा वाद झाल्याचे समोर आले होते. यूट्यूबवर हे व्हि़डीओ अपलोड झालेले आहेत. एका व्हिडीओत तर स्वामी ओम स्वतः चित्रपटाचा ट्रेलर पाहा असे सांगत आहे. यात स्वामी ओम बिकिनी गर्लबरोबर डान्स करतानाही दिसला. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्वामी ओमच्या या व्हिडीओचे काही फोटो, अखेरच्या स्लाइडवर पाहा Video..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...