आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असली-नकली बहिणीच्‍या वादात अडकला ऐश्‍वर्याचा ‘सरबजीत’ चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटाचे पोस्‍टर्स. - Divya Marathi
चित्रपटाचे पोस्‍टर्स.
अमृतसर/चंडीगड - पाकिस्तानमधील कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेल्या आणि आयुष्‍यचा शेवटही कोर्ट कचेरीत झालेल्‍या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाच्या जीवनावर आधारित ‘सरबजीत’ या आगामी हिंदी चित्रपटात ऐर्श्‍वया रॉय आणि रणबीर हुडा यांची प्रमुख भूमिका आहे. येत्या 19 मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्‍यान, मृत्‍यूनंतरही सरबजीतच्‍या कोर्ट वाऱ्या सुटायचे नाव घेईनात असेच चित्र असून, हा चित्रपट वादाच्‍या भोवऱ्यात अडकला आहे. बलजिंदर कौर आणि दलबीर कौर या दोन महिलांनी आपण ररबजीतची बहीण असल्‍याचा दावा केला. परंतु, यापैकी नेमकी खरी बहीण कोण, हा प्रश्‍न उपस्‍थ‍ित झाला असून, कथित बहीण बलजिंदर हिने न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्‍ये तिने या चित्रपटाचे काम थांबण्‍याची मागणी केली.
काय आहे प्रकरण...
- अमृतसर आणि तरनतारन जिल्‍ह्यात या चित्रपटाचे चित्रकरण सुरू आहे.
- आपण सरबजीतची खरी बहीण असल्‍याचा दावा लुधियानाची बलजिंदर या महिलेने केला असून, तिने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. शिवाय दलबीर ही सरबजीतची कुणीही लागत नसल्‍याचे तिने म्‍हटले आहे.
- बलजिंदर कौर हिने सांगितले की, आमच्‍या दहा भावंडापैकी एक सरबजीत होता. दलबीर कौरसोबत आमचे काहीही नाते नाही.
- दलबीरने आमच्‍या कुटुंबासोबत जवळीकता वाढवली आणि आता तिने आपण सरबजीतची बहीण असल्‍याचा दावा केल्‍याचा आरोपही बलजिंदर कौर हिने केला.

काय आहे चित्रपटावर आक्षेप
- बलजिंदर यांच्‍या समर्थनार्थ त्‍यांचे भाऊ चरणजीत सिंह उतरले आहेत. शिवाय भाजपचे नेता एम. पी. सिंह यांनीही त्‍यांची बाजू घेतली आहे. या सर्वांनी आक्षेप घेतला की, या चित्रपटात वस्‍तुस्थिती प्रकाश टाकल्‍या जात नाही.
- त्‍या अनुषंगाने त्‍यांनी दिग्‍दर्शक उमंग कुमार, निर्माता संदीप सिंह, जीशान कादरी, अभिनेत्री ऐश्वर्य रॉय बच्चन, अभिनेता रणदीप हुड्डा यांना नोटिस पाठवली आहे. परंतु, तरीही चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे.
वादात आणखी एकाची उडी
- दुसरीकडे बॉक्स मीडियाचे मालक सुरिंदर रिहाल यांनी दावा केला आहे की, या विषयावर चित्रपट बनवण्‍याबाबत आपण दलबीर यांच्‍यासोबत वर्ष 2012 मध्‍ये करार केलेला आहे.
- शिवाय यावर सुभाष घई यांनी चित्रपट बनण्‍याचा प्रयत्‍न केला तर त्‍यांना आपण कायदेशीर नोटिस पाठवल्‍याचेही सुरिंदर रिहाल यांनी म्‍हटले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...