आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीच्या कंडोम अॅडवर नेत्याने घेतला आक्षेप, म्हणाले मान खाली घालावी लागते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लियोनीच्या कंडोमच्या अॅडवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. - Divya Marathi
सनी लियोनीच्या कंडोमच्या अॅडवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
एंटरटेनमेंट डेस्क - सनी लियोनीच्या अॅडच्या मुद्यावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीवर गोव्यातील एका नेत्याने आक्षेप घेतला आहे. तो म्हणाला, ज्याप्रकारे अॅडचा प्रचार केला जात आहे, तो बंद करायला हवा. या जाहिरातीमुळे मान खाली घालावी लागत असल्याचेही ते म्हणाले. सनी लियोनी मॅनफोर्स कंडोमची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. 

पूर्वीही झाला आहे विरोध.. 
सनीच्या या जाहिरातीचा पूर्वीही विरोध झालेला आहे. त्यावर पुन्हा नेते फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया यांनी विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गोवा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसवर कंडोमची जाहिरात केली जाते. या अॅडचे पोस्टर बसवर लावले जाते. त्यांचे म्हणणे आहे की, अशा अॅड मधून गोव्यातील लोक काय शिकत आहेत. बसमध्ये विद्यार्थी प्रवास करतात. ते यातून काय शिकतील. ही जाहिरात सनी लियोनीवर शूट झालेली आहे. कादंबा ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये या अॅडचा प्रसार होतो. गर्भनिरोधक कंपनी आणि परिवहन मंडळाच्या कॉन्ट्रॅक्टनुसार जाहिरातीचा प्रचार होत आहे. 

यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला शाखेने सनी लियोनीच्या कंडोम अॅडचा विरोध केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, महिलांना ही जाहिरात पाहून लाज वाटते. त्यातून एक वेगळाच संदेश दिला जातो. जाहिरातीवर बंदीची मागणीही करण्यात आली होती. 

विरोधानंतर सनी म्हणाली होती, मी जेव्हा एखादा ब्रँड साईन करते, तेव्हा मी त्याची नैतिक जबाबदारी घेते. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला जन्म देऊन या जगात आणले जाते, तसेच हे आहे. एखादे कपल जेव्हा त्याला वाटते की आपण जबाबदारी घेऊ शकतो तेव्हाच ते मुलाचा विचार करतात. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सनीने शूट केलेल्या कंडोमच्या अॅडच्या शूटचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...