आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conversation To Actress Hansa Singh On Film Hunterrr And Leaked Footage From Film

ही आहे बॉलिवूडची 'सविता भाभी', 'हंटर'मुळे मिळाली प्रसिद्धी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : अभिनेत्री हंसा सिंह, इनसेटमध्ये काल्पनिक पात्र सविता भाभी)
मुंबईः हृतिक रोशन स्टारर 'क्रिश 3' मध्ये झळकलेली अभिनेत्री हंसा सिंह अलीकडेच रिलीज झालेल्या 'हंटर' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. हंसाला बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. 'हंटर'मधील अभिनयाने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण म्हणजे तिने सिनेमात साकारलेले 'सविता भाभी' हे बोल्ड कॅरेक्टर आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित 'हंटर' हा सिनेमा 20 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.
'हंटर' या सिनेमातील सेन्सॉरने कात्री फिरवलेले फुटेज लीक झाले आहे. या फुटेजमध्ये हंसा सिंह आणि या सिनेमातील मुख्य अभिनेता गुलशन देवैया यांच्यातील शारीरिक संबंध दिसत आहे. हे फुटेज झपाट्याने व्हायरल झाले आहे.
अलीकडेच divyamarathi.com सोबत चर्चा करताना अभिनेत्री हंसा सिंहने अॅडल्ट कॉमेडी असलेल्या 'हंटर'मध्ये साकारलेले सविता भाभी हे पात्र आणि सिनेमातील लीक झालेल्या फुटेजविषयी सांगितले...
सविता भाभीपासून प्रेरित असलेले पात्र साकारायला तुम्ही होकार का दिला ?
- ''जेव्हा मला ही भूमिका ऑफर झाली, तेव्हा मला सांगण्यात आले होते, की पात्राचे नाव सविता साहे असे असेल. मात्र सिनेमाच्या कथेत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा मंदर (गुलशनचे पात्र) आपल्या फोनमध्ये माझा नंबर सविता भाभी नावाने सेव्ह करतो. त्यानुसार जेव्हाही फोनची घंटी वाजते, तेव्हा 'सविता भाभी कॉलिंग' असे डिस्प्ले होते. तेव्हापासूनच हा वाद निर्माण झाला.''
या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स आहेत. शिवाय गुलशन आणि तुमच्यात शारीरिक संबंधांचा सीन चित्रीत करण्यात आला होता. तो आता व्हायरल झाला आहे, त्याविषयी काय सांगाल ?
- ''मला ठाऊक आहे, की तो कोणता सीन आहे. माझ्याकडे अनेक कॉल्स येत आहेत. जेव्हा मी हा शॉट देत होते, तेव्हा तो सिनेमाचा भाग असेल, असे वाटले होते. मात्र सेन्सॉर बोर्डाने त्या सीनवर आक्षेप नोंदवर त्यावर कात्री फिरवली. मात्र एक कलाकार म्हणून आम्हाला जे करायला सांगितले जाते, तेच आम्ही करत असतो. सटल्टी आणि व्हल्गेरिटीमध्ये एक लाइन असते. मी हा शॉट माझ्यापरीने जेवढा चांगला देता येईल तेवढा उत्तम दिला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी हा सीन शेड्युलनुसार पूर्ण करण्यासाठी सांगितले होते. हा सीन लपून शूट करण्यात आला होता. कारण त्यावेळी सेटवर खूप लोक हजर होते. विश्वास ठेवा, हा सीन करणे खूप अवघड काम होते.''
'हंटर'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सकडून कशा प्रतिक्रिया मिळाल्या ?
- ''प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी हा सिनेमा करतेय, हे मी सुरुवातीला माझ्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते. माझे कुटुंब उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे या सिनेमावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, याचा विचार करुन मी चिंतित होत होते. मात्र सिनेमा रिलीज झाला आणि तो बघून माझी आई खूप आनंदी झाली. त्यांनी म्हटले, की या सिनेमात मी खूप सुंदर दिसत आहे. वडिलांविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाही. मात्र माझा भाऊ आणि मित्र मला स्क्रिनवर बघून आनंदी आहेत.''
'हंटर'नंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आहे ?
- ''हंटरनंतर लोक मला सविता भाभी नावाने हाक मारु लागले. जेव्हा मी रस्त्यावरुन जात होते, तेव्हा लोक मला सविता भाभी नावाने हाक मारत असल्याचे माझ्या लक्षात आले. आता मी एक हॉलिवूड सिनेमा साइन केला असून येत्या मे महिन्यात त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.''
पुढे पाहा, हंसा सिंहची निवडक छायाचित्रे...