आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर ब्लास्टरच्या सिनेमाची रिलीज डेट ठरली, ही तारीख आजच राखून ठेवा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः भारतीय क्रिकेट जगतात धावांचा विक्रमी डोंगर रचणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील चित्रपट ‘सचिन- अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. स्वतः सचिनने ट्विटरच्या माध्यमातून रिलीज डेट सांगितली. येत्या 26 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.  नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेच त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘गेल्या बऱ्याच काळापासून मला सर्वजण जो प्रश्न विचारत होते हे आहे त्याचे उत्तर. ही तारीख राखून ठेवा..’ असे कॅप्शन देत सचिनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर या सिनेमासंबंधीचे एक पोस्टरही शेअर केले आहे. अतिशय लक्षवेधी अशा या पोस्टरमध्ये सचिनचा हात दिसत असून त्याच्या हातात एक बॅट आहे, ज्यावर तिरंग्याच्या रंगातील ग्रीप पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये ‘सचिन तेंडुलकर स्टॅंड’मध्ये होत असलेल्या चाहत्यांच्या कल्ल्याचीही झलक पाहायला मिळत आहे. पण अद्याप या सिनेमामध्ये सचिनच्या भूमिकेत कोण दिसणार यावरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे लाडक्या सचिनची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

‘200 नॉट आऊट’ या प्रोडक्शन कंपनीने हा सिनेमा तयार केला असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स अर्सकाईन यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जेम्स यांचे 'वन नाइट इन ट्यूरिन' आणि 'बॅटल ऑफ द सेक्सेज'सह अनेक सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सायकलिस्ट मार्को पैंटेनीवर एक सिनेमा बनवला होता, ज्याचे खूप कौतुक झाले होते.  
बातम्या आणखी आहेत...