आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींनी नोटबंदीनंतर ड्रायव्हरच्या अकाऊंटवर जमा केला पैसा, \'डेथ मिस्ट्री\'त खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांची \'डेथ मिस्ट्री\'चा तपास आता मुंबई क्राइम ब्रॅंच करत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अद्याप ओम पुरी यांच्या मृत्युबाबतची गुंतागुंत अजून सुटलेली नाही. परिणामी कोणालाही क्लीन चिट देण्यात आली नाही.

दुसरीकडे, क्राइम ब्रॅंचने ओम पुरी यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे, मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर ओम पुरी यांनी आपल्या ड्रायव्हरच्या बॅंक अकाऊंटवर रुपये जमा केले होते. मात्र, जमा केलेली अमाउंट किती होती याबाबत समजले नाही.

खुद्द ड्रायव्हरने दिली कबूली...
- क्राइम ब्रँचने ओम पुरीचा ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा यांची 11 जानेवारीला 5 तास कसून चौकशी केली.
- राम प्रमोद मिश्रा याने सांगितले की, नोटबंदीनंतर ओम पुरी यांनी त्याच्या अकाऊंटवर रुपये जमा केले होते. 
- सुरुवातीला मिश्रा हे सांगत नव्हता, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ओम पुरी यांनी त्याच्या अकाऊंटवर रुपये जमा केल्याचे कबूल केले.
- राम प्रमोद मिश्रा याची गुरुवारी देखील चौकशी झाली.

प्रोड्यूसर खालिद किदवई याचीही झाली चौकशी... 
- क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी \'राम भजन जिंदाबाद\' सिनेमाचे प्रोड्यूसर खालिद किदवई यांचीही चौकशी केली.
- सूत्रांनी सांगितले की, क्राइम ब्रँचने खालिद किदवई यांची सलग 4 तास चौकशी केली.

ओम पुरी यांची पत्नी आणि वकीलांचीही होईल चौकशी..
- क्राइम ब्रँचचे अधिकारी ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता हिच्यासह वकीलांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 
- ओम पुरी यांच्या मृत्यू प्रकरणात आता त्यांच्या मोबाईलच्या मुद्द्यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 
- ओम पुरी यांचा सापडत नसलेला फोन त्यांची दुसरी पत्नी नंदिताकडे सापडला आहे. आमच्या सुत्रांनी सांगितले की, पोलिसांनी जेव्हा तपासासाठी हा फोन मागितला तेव्हा नंदिता यांनी फोन देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र नंतर तिने तो फोन फॉरमॅट करून पोलिसांना तपासासाठी दिला. दरम्यान, ओम पुरींचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झालेला असल्याचे पोस्ट मॉर्टममध्ये समोर आल्याने या प्रकरणातील संभ्रम वाढला आहे. 
 
ओम पुरी यांच्या मृत्यूपासून त्यांचा फोन बेपत्ता होता. 6 जानेवारीच्या सकाळी पुरी त्यांच्या फ्लॅटवर मृतावस्थेत आढळले होते. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या डोक्यात दीड इंचाची जखम झाली होती. संशयास्पद मृत्यूनंतर आता पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

फोनचे अखेरचे लोकेशन होते वर्सोवामध्ये... 
- सुत्रांच्या माहितीनुसार ओम पुरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल कोणीही पाहिला नव्हता. 
- प्राथमिक तपासणीमध्ये पोलिसांनी जेव्हा नंदिता यांना मोबाईलबाबत विचारले तेव्हा, त्यांनीही फोन द्यायला नकार दिला होता. - पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. त्यात अखेरचे लोकेशन वर्सोवामध्ये मिळाले होते. 
- नंदिता राहतात ते त्रिशूल अपार्टमेंटही वर्सोवामध्येच आहे. 
- पोलिसांनी दुसऱ्यांदा जेव्हा नंदिता यांना मोबाईलबाबत विचारले तेव्हा त्यांनी मोबाईल त्यांच्याकडेच असल्याचे सांगितले. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोबाईलबाबत काय सांगितले ओम पुरींच्या नीकटवर्तीयांनी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)