आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टेडिअममध्ये झाले सलमानचे वेलकम, खान कुटुंबाला बघण्यासाठी उसळली गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बहिणीच्या रिसेप्शनसाठी हिमाचल प्रदेशात पोहोचला सलमान खान)
शिमलाः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचे वेडिंग रिसेप्शन सोमवारी हिमाचल प्रदेशातील मंडी येथे आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शनला संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. यावेळी खान कुटुंबीयांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. ज्या ठिकाणी अर्पिता आपल्या कुटुंबासोबत पोहोचली होती, ते स्टेडिअम गर्दीपुढे छोटे पडले. मात्र तरीदेखील खान कुटुंबाने चाहत्यांना अभिवादन केले आणि त्यांचे आभार व्यक्त केले. सलमानने फ्लाइंग किस देऊन चाहत्यांचे अभिवादन केले. सलमान खानसोबत त्याची आई सलमा खान, धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान मंडी येथे पोहोचले आहेत.
सलमान खान सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास स्पेशल हेलिकॉप्टरने सुंदरनगर पॉलिटेक्निक ग्राउंडवर दाखल झाला. येथून जवळजवळ एकच्या सुमारास तो मंडी येथील अर्पिताचे सासरे अनिल शर्मा यांच्या हॉटेल पॉम रिसॉर्टमध्ये पोहोचला. दोन तास विश्रांती घेतल्यानंतर दुपारी 3.15 च्या सुमारास पड्डल स्टेडिअमध्ये तो दाखल झाला. पड्डल स्टेडिअमध्ये सलमानची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. सलमानने आपल्या चाहत्यांची निराश न करता स्टेडिअममध्ये पुढे येऊन त्यांचे अभिवादन स्वीकारले. सलमान आणि त्याचे कुटुंब अर्धा तास येथे होते.
पुढे पाहा, सलमानची आणखी काही छायाचित्रे...