आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी...' पाहून सलमानसाठी हमसून-हमसून रडली ही चिमुकली, म्हणाली, 'I Love Him'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडेच रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' प्रेक्षकांना चांगला भूरळ घालत असल्याचे दिसत आहे. एकिकडे समीक्षकांकडून सिनेमाची प्रशंसा होत असताना दुसरीकडे सिनेमा प्रेक्षकांना भावूक करत आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक सिनेमा आणि सलमानच्या अभिनयाने प्रभावित झाला आहे.
गेल्या दिवसापासून यू-टयूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये एका छोट्या मुलीला सिनेमात सलमानला भावूक झालेला पाहून रडू कोसळले. ती रडत-रडत म्हणते, 'I Love Him'. सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानने हा व्हिडिओ सोशल साइट्सवर शेअर केला आणि लिहिले, 'This little girl's reaction at the end of my film is truly overwhelming.'
'बजरंगी भाईजान' एक पाकिस्तानी मुलगी शाहिदा अर्थातच मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) आणि पवन कुमार चतुर्वेदी अर्थातच बजरंगी (सलमान खान)ची कहाणी आहे. भारतात हरवलेल्या मुन्नीला पाकिस्तानात पोहोचण्याची जबाबदारी बजरंगी उचलतो. त्यामध्ये पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब (नवाजुद्दीन सिद्दीकी) त्याची मदत करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भावूक झालेल्या चिमुकलीचे फोटो...