आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, सन्मान मिळवणारे 47 वे चित्रपट कलावंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - "भारतकुमार' ऊर्फ मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे? योगदानदेखील साधेसुधे नव्हे तर ज्या पात्राने त्यांना खरी ओळख मिळवून िदली त्याच पात्राचा या पुरस्कारातून सन्मान झाला. या कामामध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्वच बेमालूमपणे िमसळले गेले, आज याच "भारतकुमार'बद्दल बोलू या. बहुतांश लोक त्यांना मनोजकुमार म्हणतात. परंतु हे त्यांचे खरे नाव नाही. अबोटाबाद (आता पाकिस्तानात) २४ जुलै १९३७ रोजी जन्मलेल्या मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी आहे. अभिनेते दिलीपकुमार यांचा त्यांच्यावर सखोल प्रभाव होता. इतका की १९४९ मध्ये चित्रपट "शबनम'मध्ये ज्या दिलीप कुमारने मनोजकुमारचे पात्र साकारले होते, त्यामुळेच त्यांना ओळख मिळवून िदली. त्यांनी नाव बदलून मनोजकुमार असे ठेवले.
...आणि आता हरिकिशनचा मनोज बनलेल्या व्यक्तीचा "भारतकुमार ' कसा झाला याचा हा किस्सा. मनोजकुमार यांचा "शहीद' चित्रपट १९६५ मध्ये आला होता. त्यात त्यांनी शहीद -ए- आझम भगतसिंग यांचे पात्र साकारले होते. वास्तव आयुष्यात ते भगतसिंग पासून खूप प्रभावित आहेत. हा चित्रपट तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी पाहिला होता. त्या काळात पंतप्रधान शास्त्रींनी देशाला "जय जवान- जय किसान'चा नारा दिला होता. तो नारा ते देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी चित्रपटापेक्षा चांगले माध्यम दुसरे कुठले होते? त्यामुळे त्यांनी मनोजकुमार यांना सल्ला दिला की हा नारा केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती फिरणारा एक चित्रपट तयार करावा. त्यातून मनोजकुमार यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट साकारला. तो होता "उपकार'(१९६७). त्यात त्यांनी गावातील युवक "भारत'चे पात्र साकारले होते. व्यवसायाने शेतकरी होता. परंतु १९६५ मध्ये शत्रूने जेव्हा देशावर हल्ला केला तेव्हा तो सीमेवर मोर्चा सांभाळणाऱ्या जवानाच्या भूमिकेतही दिसला. शास्त्रींना जे अपेक्षित होते ते साध्य झाले होते. परंतु त्याच वेळी मनोजकुमार यांना एक उद्देशही मिळाला. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते स्वत:चे विचार प्रकट करण्याचा. तेव्हा सुरू झालेला सिलसिला आज ७८ व्या वर्षांपर्यंत कायम आहे. सध्या ते नव्या कलावंतांना घेऊन एक चित्रपट बनवत आहेत. "आखरी गोली'. त्याची कथा त्यांनीच लिहिली असून ती स्वातंत्र्यापूर्वीच्या दोन क्रांतिकारकांच्या विचारधारेवर आधारित आहे.
ही बातमी पचवण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल - मनोज कुमार