आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dangal Aamir Sakshi Poses With The Geeta And Babita Phogat

हरियाणवी लूकमध्ये बबीता आणि गीता फोगटसोबत दिसले आमिर-साक्षी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी तन्वर, गीता-बबीता फोगटसोबत आमिर खान - Divya Marathi
साक्षी तन्वर, गीता-बबीता फोगटसोबत आमिर खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच आमिर खानच्या आगामी 'दंगल' या सिनेमाच्या सेटवरील एक छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रात आमिर हरिणायवी लूकमध्ये रेसलर बबीता आणि गीता फोगटसोबत दिसतोय. त्यांच्यासोबत दंगलची लीड अॅक्ट्रेस साक्षी तन्वरही दिसत आहे. तीदेखील हरियाणवी गेटअपमध्ये दिसतेय. दंगलमध्ये साक्षीने आमिरच्या पत्नीची भूमिका वठवली आहे. सिनेमाचे शूटिंग सध्या लुधियानामध्ये सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वीच आमिरने आपल्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमध्ये आमिरचा चेहरा चिखलाने माखलेला दिसतोय.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' हा सिनेमा हरियाणवी रेसलर महावीर फोगट यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुली बबीता आणि गीता फोगट यांना रेसलिंगचे ट्रेनिंग देऊन नॅशनल चॅम्पिअन बनवले. या सिनेमासाठी आमिरने 30 किलो वजन वाढवले असून लूकसुद्धा बदलला आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 23 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणारेय.
पुढे पाहा, 'दंगल'चे रिलीज झालेले ऑफिशिअल पोस्टर...