आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Dangal' Actor Aamir Khan To Lose 25 Kgs In 25 Weeks

25 आठवड्यांत 25 किलो वजन कमी करणार आमिर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मकरसंक्रांतीच्या खास निमित्ताने अभिनेता आमिर खानने पतंगबाजी केली आणि सोबतच आपल्या चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा देत ट्विट केले, “Wishing everyone a very happy Makar Sankranti!!! Flying kites is one of my childhood passions! Love. a”
आमिरने गेल्या सहा महिन्यांत आपले बरेच वजन वाढवले असून आता त्याचे वजन 95 किलो इतके झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच आमिरने वजन कमी करायला सुरुवात केली आहे. तब्बस 25 किलो वजन कमी करण्यासाठी त्याच्याकडे आता 25 आठवड्यांचा कालावधी आहे.
वजन कमी करण्यासाठी आमिर डाएट आणि वर्कआउटच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतोय. यामध्ये दररोज एक तासांचे इंटेंस वर्कआउटचा समावेश आहे. सूत्रांच्या मते, आमिरचे वर्कआउट एखाद्या रेसलरप्रमाणे आहे. तो काय खातो, यावर त्याचे डायटिशियन डॉ. विनोद धुरंदर यांचे बारीक लक्ष असते. दोन तासांच्या डाएट प्रोसेसनुसार त्याला प्रत्येक दोन तासाला काही खावे लागते. यानुसार आमिर दिवसाला नऊ वेळा जेवण करतो. अर्थातच येणा-या प्रत्येक आठवड्यात आमिरचे एक नवीन रुप त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणारेय.