आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दंगल'चा नवा रेकॉर्ड, 'बाहुबली २' ला पछाडत जगभरातील या ५ चित्रपटांमध्ये झाला समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नितेश तिवारीने दिग्दर्शित केलेला आमिर खानचा चित्रपट 'दंगल'ने आतापर्यंत जगभरात 1719 कोटी रुपये कमविले आहेत. इतक्या बक्कळ कमाईमुळे हा चित्रपट जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 5 नॉनइंग्लिश चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत दोन चायनीज, एक फ्रान्स, एक जापानी चित्रपटाचा समावेश आहे. मागे पडला 'बाहुबली २'...
 
- कमाईचा विचार केला असता दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा 'बाहुबली २' या यादीत खूप मागे राहिला आहे. 
- 'बाहुबली २' ने जगभरातील बॉक्सऑफिसवर 1633 कोटी कमविले आहेत. 
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बाहुबली 2' चित्रपटाचे कलेक्शन आता थांबले असून तो 1700 कोटीपर्यंत मजल मारेल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. 
 
चीनमध्ये असे आहे 'दंगल'चे रेकॉर्ड..

- केवळ चीनमध्येच 'दंगल'ने 942 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. तैवानमध्ये 32 कोटी, रो मध्ये 745 कोटी अशी मिळून 1719 कोटीची कमाई दंगलने केली आहे.
 
टॉप 5 नॉन-इंग्लिश चित्रपटात बाकीच्या 4 चित्रपटांविषयी जाणून घ्या पुढच्या स्लाईडवर..
बातम्या आणखी आहेत...