आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दंगल गर्ल\'च्या आईने केला होता पाकला सपोर्ट, सोशल मीडियावर सुरू आहे Trolling

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झायरा वसीम आणि तिची आई जारका वसीमने 2014 मध्ये केलेली पोस्ट. - Divya Marathi
झायरा वसीम आणि तिची आई जारका वसीमने 2014 मध्ये केलेली पोस्ट.
मुंबई - आमीर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल'मध्ये पहिलवान गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका करणारी अॅक्ट्रेस झायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झायराच्या आईने काही वर्षांपूर्वी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात तिची आई पाकिस्तानला सपोर्ट करत असल्याचे दिसत आहे. कॉमेडीयन सोनम महाजन हिने या पोस्ट पुन्हा सर्वांसमोर आणल्या आहे. 

पाकिस्तानी झेंड्यासह लिहिले, भारताला पराभूत करा 
झायरा वसीमची आई झारका वसीमने सुमारे 3 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या एका मॅचमध्ये पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. आता कॉमेडीयन सोनम महाजनने त्यांच्या या पोस्ट सोशल मीडियावर सर्वांसमोर आणल्या आहेत. झायराच्या आईने मार्च 2014 मध्ये पाकिस्तानच्या झेंड्यासह एक पोस्ट शेयर केली होती. त्यात लिहिले होते,  Keep Calm and Defeat India. ढाक्यात सुरू असलेली इंडिया-पाकिस्तान दरम्यानची वर्ल्ड टी-20 चॅम्पियनशिपची ती मॅच होती. सोशल मीडियावर हे वृत्त आल्यानंतर मात्र त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. 

सोनम महाजनचे अकाऊंट बंद 
झायराच्या आईची ही वादग्रस्त पोस्ट सर्वांसमोर आणणाऱ्या सोनम महाजनचे ट्वीटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ट्विटरवर तिचे 60 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

नुकतीच घेतली होती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची भेट 
झायरा वसीमने काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर बरेच ट्रोलिंग झाले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, झायराच्या आईच्या अँटी इंडियन पोस्ट आणि यूझर्सच्या कमेंट्स.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...