आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dangal Vs Sultan 10 Day Collection: This Is How Aamir Khan Beats Salman Khan Films Record

\'सुल्तान\'च्या पुढे निघाला आमिरचा \'दंगल\', 10 दिवसांत केली 270 कोटींची कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने रिलीजच्या 10 दिवसांत तब्बल 270 कोटींची कमाई करत सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमाला मागे टाकले आहे. दुस-या रविवारी दंगलने 31.27 कोटींचा गल्ला जमवला आहे. याची माहिती देताना ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट केले, "#Dangal is SENSATIONAL in Weekend 2... [Week 2] Fri 18.59 cr, Sat 23.07 cr, Sun 31.27 cr. Total: 270.47 cr. India biz. FANTABULOUS!" 
 
'सुल्तान'ला मागे टाकत अशी सुरु आहे 'दंगल'ची घौडदौड...
सुरुवातीच्या 10 दिवसांत 'सुल्तान'ने 236.59 कोटींचे कलेक्शन केले होते. सलमानच्या सिनेमाने मागे टाकत आमिरच्या 'दंगल'ने 270 कोटी कमावले आहेत.  
 
   सुल्तान   दंगल
पहिला दिवस 36.54 कोटी रुपये  29.78 कोटी रुपये 
दुसरा दिवस 37.32 कोटी रुपये  34.82 कोटी रुपये 
तिसरा दिवस  31.67 कोटी रुपये  42.41 कोटी रुपये 
चौथा दिवस  36.62 कोटी रुपये  25.69 कोटी रुपये 
पाचवा दिवस  38.21 कोटी रुपये  23.09 कोटी रुपये 
सहावा दिवस  15.54 कोटी रुपये  21.46 कोटी रुपये 
सातवा दिवस  12.92 कोटी रुपये  20.29 कोटी रुपये 
आठवा दिवस  10.82 कोटी रुपये  18.59 कोटी रुपये 
नववा दिवस  9.52 कोटी रुपये  23.07 कोटी रुपये 
दहावा दिवस  7.43 कोटी रुपये  31.27 कोटी रुपये 
दहा दिवसांची एकुण कमाई  236.59 कोटी रुपये  270.47 कोटी रुपये 
 
 
आता तुटणार 'सुल्तान'चे लाइफटाइम कलेक्शन!
'सुल्तान'चे लाइफटाइम कलेक्शन 300.45 कोटी इतके आहे. ओवरसीज कमाई चा आकडा मिळून एकुण  कमाई 584 कोटींपर्यंत पोहोचले होते. तर 'दंगल'ने अवघ्या 10 दिवसांत 270 कोटींचा आकडा गाठला आहे. आणि या सिनेमाची ओवरऑल कमाई 506 कोटींहून अधिक राहिल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे  'दंगल' सलमानच्या सिनेमाच्या लाइफटाइम कमाईच्या आकड्यांना मागे टाकेल, असे चित्र आहे. 

 आमिरचा 'दंगल' कसा ठरतोय माइलस्टोन, वाचा पुढील स्लाईडवर...
 
बातम्या आणखी आहेत...