आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅनीचा खुलासा : ब्रेकअपनंतरही त्यांच्या बेडरूममध्ये असायची परवीन बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॅनी डेन्जोंगपा आणि परवीन बाबी. - Divya Marathi
डॅनी डेन्जोंगपा आणि परवीन बाबी.
मुंबई - 'बेबी' (2015), 'जय हो' (2014), '16 डिसेंबर' आणि 'अग्निपथ' (1990) सारख्या चित्रपटांमधून भूमिका केलेले डॅनी डेन्जोंगपा यांनी परवीन बाबीबरोबर असलेल्या त्यांच्या नात्याबाबत मोकळेपणाने चर्चा केली आहे. 70 च्या दशकात सुमारे चार वर्ष डॅनी आणि परवीन यांचे अफेयर होते. दोघेही विना लग्नाचेच एकत्र राहत होते. त्याकाळी ही मोठी बाब मानली जायची. डॅनीने सांगितले की, दोघांच्या मर्जीने त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि त्यानंतरही ते चांगले मित्र होते. 

ब्रेकअपनंतरही असायची बेडरूममध्ये 
- एका मुलाखतीत डॅनीने सांगितले की, ब्रेकअपनंतरही परवीन अनेकदा त्यांना डीनरसाठी बोलवायची. पण त्यावेळी त्यांची गर्लफ्रेंड दुसरीच कोणीतरी होती. 
- डॅनी यांच्या मते, पॅकअपनंतर चित्रपटाच्या सेटवरून किम (यशपाल) ला पिक करायचो आणि घरी पोहोचायचो तेव्हा परवीन बेडरूममध्ये व्हिसीआरवर चित्रपट पाहत असायची. मी अनेकदा तिला तसे करण्यास मनाई केली होती. पण ती म्हणायची आपल्यात तसे काहीही नाही. आपण केवळ चांगले मित्र आहोत. 
- डॅनीच्या मते त्यांनी महेश भट्ट (त्यावेळचे परवीन बाबीचे नवे बॉयफ्रेंड) यांना परवीनला समाजावून सांगण्यास सांगितले होते. 

परवीन यांच्याबाबत डॅनीने केलेले इतर काही खुलासे पुढील स्लाइड्सवर...

 
बातम्या आणखी आहेत...