आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google ची घोषणा: 'वंडर वुमन'ला मागे टाकत 'डियर जिंदगी'ने केला रेकॉर्ड, गेम्समध्ये 'बाहुबली' नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहरुख खान आणि आलिया भट्टची फिल्म 'डियर जिंदगी'ने एक नवा रेकॉर्ड केला आहे. शुक्रवारी गुगलने घोषणा केली आहे, की 'डियर जिंदगी' ही भारतात गुगल प्लेवरील वर्षभरातील सर्वात लोकप्रिय फिल्म ठरली आहे. यानंतर या लिस्टमध्ये 'मोआना' आणि 'वंडर वुमन'चा क्रमांक लागतो. फिल्म शिवाय गुगलने सांगितले आहे, की  'फोटो एडिटर- ब्यूटी कॅमेरा अँड फोटो फिल्टर' आणि 'मॅसेंजर लाइट' हे 2017 मधील टॉप ट्रेंडिंग अॅप राहिले आहे. 

 

हे गेम्स राहिले टॉप 
- 'बाहुबली: द गेम'ने 'डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन्स', 'सुपर मारियो रन' आणि 'पॉकेमन ड्यूल' सारख्या आंतरराष्ट्रीय गेम्सला मात देत पहिला क्रमांक पटकावला आहे. 
- पुस्तकांमध्ये करण जोहर, ऋषि कपूर आणि रघुराम राजन यांची पुस्तके टॉपवर राहिली आहेत. 
- गुगल दरवर्षी त्यांची डिजिटल वितरण सेवा गुगल प्लेवर सर्वाधिक लोकप्रिय अॅप्स, गेम्स, म्यूझिक, मुव्हिज आणि पुस्तकांची यादी प्रकाशित करीत असते. 

बातम्या आणखी आहेत...