आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

D\'Anniv: फिरोज खान यांच्या अंत्ययात्रेत गैरहजर होते बडे स्टार्स, दिसला होता हृतिक रोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुझान खानसोबत हृतिक रोशन, उजवीकडे - पार्थिवाला खांदा देताना फरदीन खान)
मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांना या जगाचा निरोप घेऊन सहा वर्षांचा काळ लोटला आहे. 27 एप्रिल 2009 रोजी कॅन्सरमुळे बंगळूरूमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. बंगळूरुमध्येच त्यांच्या पार्थिवावार अंत्य संस्कार करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रसिद्ध अभिनेत्याला अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधील कोणताही बडा स्टार येथे आला नव्हता. मात्र हृतिक रोशन फिरोज खान यांना अखेरचा निरोप द्यायला आला होता.
हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिचे फिरोज खान काका होते. या नात्याने हृतिक त्यांचा जावई होता. त्यांच्या अंत्ययात्रेत मुलगा फरदीन खान, भाऊ संजय खान, हृतिक रोशन, सुझान रोशनसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक सहभागी झाले होते. त्यांची कबर होसूर रोडस्थित शिया कब्रिस्तानमध्ये त्यांच्या आईच्या कबरजवळ तयार करण्यात आली आहे. फिरोज खान यांनी भारतीय सिनेसृष्टीत अभिनेता, एडिटर, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
'दीदी' हा होता पहिला सिनेमा
1960 मध्ये 'दीदी' या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात ते सेकंड लीड रोलमध्ये होते. त्यांच्यासह सुनील दत्त, शोभा खोटे आणि ललिता पवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 1960 - 1980 या काळात फिरोज यांनी 'रिपोर्टर राजू', 'सुहागन', 'ऊंचे लोग', 'आरजू', 'औरत', आदमी और इंसान', 'मेला', 'खोटे सिक्के' आणि 'धर्मात्मा' सह एकुण 50 सिनेमांमध्ये अभिनय केला. अभिनेता म्हणून 2007मध्ये रिलीज झालेला 'वेलकम' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
खासगी आयुष्य
फिरोज खान यांचा जन्म 25 सप्टेंबर 1939 कोजी बंगळूरु येथील एका पठाण कुटुंबात झाला होता. येथील बिशप कॉटन बॉईज स्कूल आणि सेंट गेमॅन हायस्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. 1965 मध्ये त्यांचे लग्न झाले. सुंदरी हे त्यांच्या पत्नी नाव होते. 20 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. फिरोज खान यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. फरदीन खान हे मुलाचे तर लैला खान ही त्यांची नावे आहेत. फरदीन बॉलिवूड अभिनेता असून गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशासोबत फरदीनचे लग्न झाले आहे.
अवॉर्ड्स आणि नॉमिनेशन
'इंसान' (1971) साठी फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
'सफर' (1971) साठी फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
'इंटरनेशनल क्रुक' (1975)साठीफिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
फिल्मफेयर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड (2001)
निगेटिव्ह रोलसाठी IIFA अवॉर्ड (2004)
झी सिने अवॉर्ड्स फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट (2008)
"प्राइड ऑफ द इंडस्ट्री" मॅक्स स्टारडस्ट अवॉर्ड (2009)
पुढे छायाचित्रांमध्ये पाहा फिरोज खान यांची अंत्ययात्रा..