आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Have Not 'Sultan' Robot 2 'or Hrithik Roshan Starrer Movie

'रोबोट 2' आणि 'सुल्तान'चा दीपिकाला प्रस्तावच नव्हता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पिकू'च्या यशाच्या जोरावर दीपिकाला जवळपास आणखी तीन चित्रपटांचा प्रस्ताव मिळाल्याची चर्चा होती. मात्र, त्यातील एकही चित्रपट तिच्या वाट्याला आला नसल्याने दीपिकाच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
रजनीकांत यांच्या 'रोबोट 2', सलमान खानच्या 'सुल्तान' आणि हृतिकच्या आगामी चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणचा समावेश असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, दीपिकाने आपल्याला यातील एकाही चित्रपटाचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगत या चर्चेमधील हवाच काढून टाकली आहे. यानिमित्ताने दीपिकाचा स्पष्टवक्तेपणा पाहायला मिळाला. कारण काही सिनेस्टार निव्वळ चर्चेत राहण्यासाठी आपल्याला अमुक-अमुक चित्रपटाचा प्रस्ताव होता, असे सतत सांगत असतात. दीपिका मात्र याच्या स्पष्ट विरोधात आहे. त्यामुळे तर दीपिकाने स्वत:हून ही गो‌ष्ट समोर आणली आहे.
दीपिकाने याबाबत बोलताना सांगितले की, 'माझा ब्रेक घेण्याचा तूर्त तरी विचार नाही. त्यामुळे जे चित्रपट मला आवडतात ते मी स्वीकारतच असते. आता यातील एकाही चित्रपटाचा प्रस्ताव मला आलाच नाही तर माझ्याकडे इतके चित्रपट आहेत हे मी कशाला सांगू? मी सध्या माझ्या 'लिव लव लाफ' नावाने फाउंडेशन सुरू केले असून मोकळ्या वेळेत मी याचे काम करणार आहे. शिवाय पुढील काही महिन्यांमध्ये 'तमाशा' आणि 'बाजीराव मस्तानी'च्या प्रमोशनासाठीदेखील मला वेळ द्यावा लागणार आहे.
श्रीराम राघवन यांचा मात्र आपण एक चित्रपट करणार असल्याचे दीपिकाने मान्य केले असून याचे शूटिंग जानेवारीमध्ये सुरू होणार असल्याचे समजते. शिवाय अन्य दिग्दर्शकासोबतदेखील दीपिका चर्चा करत असून यातील काही चित्रपटांचे शूटिंगही पुढच्या वर्षीपासून सुरू होणार असल्याचे समजते.
दीपिका 'बाजीराव मस्तानी' द्वारे शाहरुखच्या 'दिलवाले'ला आव्हान देणार, या आशयाच्या एका ट्विटची काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगत आहे. यावर दीपिका म्हणते की, ''चर्चा कोणती होती आणि त्यातून जो अर्थ काढण्यात आला आहे त्याचा माझ्या आणि शाहरुखच्या मैत्रीवर काहीएक परिणाम होणार नाही. माझ्या चित्रपटातून मी कोणाला आव्हान देतेय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. चित्रपट कोणत्या तारखेला रिलीज करायचे यामध्ये मी लक्ष घालत नाही.''