आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Demands 8 Cr For 3 Days Shooting, Highest In Celebrity Endorsement

जाहिरातीसाठी दीपिकाने वाढवले मानधन, 3 दिवसांसाठी मागितले 8 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर डील फायनल झाली तर दीपिका शाहरुख, सलमान, आमिर किंवा रणबीरच्या रांगेत गणली जाईल. - Divya Marathi
जर डील फायनल झाली तर दीपिका शाहरुख, सलमान, आमिर किंवा रणबीरच्या रांगेत गणली जाईल.
मुंबई: दीपिका पदुकोणने एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी आठ कोटी रुपये मानधन मागितले आहे. हे मानधन तीन दिवसांच्या शूटसाठी आहे. अर्थातच एका दिवसाची फी जवळपास 2.66  कोटी रुपये असेल. जर ही डील फायनल झाली तर दीपिलाला सलमान, शाहरुख, आमिर आणि रणबीरच्या रांगेत बसवले जाईल. स्पोर्ट्स सेलिब्रिटींमध्ये महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीच्या मानधनसुध्दा इतकेच आहे. 
 
कोणत्या कंपनीसोबत चर्चा सुरु आहे...
- divyamarathi.comच्या सूत्रांनुसार, ही एंडोर्समेंट डील एका एअरलाइन कंपनीसोबत सुरु आहे. 
- जर दीपिकाने ही डील साइन केली तर ते \'ए\' लिस्टर अभिनेत्रींच्या जाहिरातीच्या मानधनापेक्षा खूप जास्त असेल. प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसारखे स्टार्स एका दिवसाच्या जाहिरातीसाठी 1 कोटी रुपये घेतात. 
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, दीपिकाने आठ कोटी रुपये मानधन तीन दिवसाच्या शूटसाठी मागितले आहे. म्हणजेच एका दिवसाचे मानधन 2.66 कोटी रुपये आहे. 
 
जाहिरातीसाठी दररोज होते पेमेंट...
- जाहिरातीच्या शूटसाटी पेमेंट दररोजच्या हिशोबानुसार होते. 
- त्यासाठी दीपिका 1.5 कोटी रुपये चार्ज घेते. परंतु दीपिकाने या जाहिरातीसाठी शाहरुख, सलमान, आमिर आणि रणबीर यांच्या बरोबरीने मानधन घेणारी पाहिली अभिनेत्री ठरेल. 
- स्पोर्ट्स सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाले तर महेंद्र सिंह धोनीसुद्धा इतके मानधन घेतात. विराट कोहलीने अलीकडेच हा आकडा वाढवला आहे. 
 
डील शेवटच्या टप्प्यात...
- दीपिका आणि कंपनीमध्ये बातचीत सुरु आहे. ही बातचीत शेवटच्या टप्प्यात आली आहे. 
- दीपिकाच्या टीमसोबत याविषयी बातचीत केली तर ते या मानधनाबाबत खात्रीशीर नाहीत. ते या विषयी गोंधळात दिसले. 
- जर स्टार व्हॅल्यूविषयी बोलायचे झाले तर तज्ञ सांगतात, \'दीपिका मार्केट व्हॅल्यूनुसार, टॉपवरच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मागील वर्षी तिचे \'पीकू\' आणि \'बाजीराव मस्तानी\' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.\'
- \'त्यानुसार, दीपिकाने मागितलेले मानधन योग्य आहे. दीपिका एक दिवसाच्या शूटसाठी 2 कोटींपेक्षा जास्त मानधन मागत आहे.\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रियांका-कतरीना, आलिया-अनुष्कासारख्या अभिनेत्री किती मानधन घेतात...
 
बातम्या आणखी आहेत...