आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'डॉन 3'साठी दीपिकाची निवड, प्रियंकाला केले रिप्लेस?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पद्मावती'च्या वादामुळे दीपिका पदुकोन सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. इंडस्ट्रीमध्येही सध्या तिचीच चर्चा आहे. दरम्यान अशी माहिती आहे, की दीपिकाने 'डॉन 3' मध्ये काम करण्याचे निश्चित केले आहे. असे झाले तर ती प्रियंका चोप्राला रिप्लेस करेल. अशीही माहिती आहे, की शाहरुख खानने या फिल्मच्या प्रोडक्शन हाऊसला दीपिकाचे नाव सुचवले होते. एका नामांकित दैनिकाच्या वृत्तानुसार, शाहरुख आणि प्रियंका यांच्यातील एका व्यक्तिगत वादाचा अजून शेवट झालेला नाही, त्यामुळे प्रियंका एसआरकेसोबत काम करण्यास इच्छूक नाही. फिल्मचे प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी 'डॉन 3' बनवणार असल्याची घोषणा केली होती, मात्र योग्य स्क्रिप्ट मिळाल्यानंतर. प्रियंकाने डॉन आणि डॉन 2 मध्ये रोमाचे कॅरेक्टर केले होते. डॉन 3 मध्येही ती असेल असा कयास होता. 

बातम्या आणखी आहेत...