आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ट्रिपल एक्स...'चा ट्रेलर रिलीज, अॅक्शन करताना दिसली दीपिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अॅक्टर विन डीजल - Divya Marathi
ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अॅक्टर विन डीजल
मुंबईः दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अॅक्टर विन डीजल यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दीपिका अॅक्शनसोबतच मारधाड करताना दिसत आहे. सिनेमातील एका सीनमध्ये ती विन डीजलच्या पोटावर बंदूक लावताना दिसतेय. यापूर्वीसुद्धा या सिनेमाचा एका टीजर रिलीज झाला होता, यामध्ये दीपिका केवळ दहा सेकंदांसाठी दिसली होती.

शिकारी आणि प्रेयसीच्या भूमिकेत दीपिका...
बातम्यांनुसार, दीपिकाने या सिनेमात शिकारी आणि प्रेयसीची भूमिका साकारली आहे. सिनेमात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नीना डोबरेवर एका विनोदी टेक्निकल एक्सपर्टच्या तर रुबी रोज एका शूटरच्या भूमिकेत आहेत. डीजलने एनएसए एजेंटची भूमिका साकारली आहे. सॅम्युअल एल जॅक्सन या अभिनेत्याचीही महत्त्वाची भूमिका सिनेमात आहे. अमेरिकन दिग्दर्शक डीजे करुसोच्या या सिनेमाची स्क्रिप्ट स्कॉट फ्रॅजियरने लिहिली आहे. हा सिनेमा 20 जानेवारी 2017 रोजी रिलीज होणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमाचा ट्रेलर आणि फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...