मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोणने व्होग मॅगझिनच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकासाठी एक खास फोटोशूट केले आहे. या अंकाला 'दि बनारस स्टोरी' हे शीर्षक देण्यात आले आहे. यावर 'स्टारिंग दीपिका पादुकोण अँड सब्यासाची मुखर्जी' असे नोंदवण्यात आले आहे. व्होगसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये दीपिकाचा स्टनिंग लूक लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये दीपिकाने लहेंग्यापासून बनारसी साडीत फोटोशूट केले आहे. सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये आहे बिझी...
दीपिका पदुकोणचा 'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केग' हा हॉलिवूड सिनेमा 2017 मध्ये रिलीज होणारेय. या सिनेमाचे ट्रेलरसुद्धा समोर आले आहेत. तर बॉलिवूडमध्ये दीपिकाचा आगामी सिनेमा 'पद्मावती' हा आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून रणवीर सिंह तिच्या अपोझिट आहे. संजय लीला भन्साळी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, दीपिकाचे फोटोशूट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)