आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावती\' पाहाण्यापूर्वी जाणून घ्या, दीपिकाच्या \'घुमर\' बद्दल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/मुंबई - संजय लीला भंसाळीचा वादग्रस्त चित्रपट 'पद्मावती' मध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. सध्या दीपिकाचा 'घुमर' डान्स ट्रेंडमध्ये आहे. याची सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले, की 'घुमर' डान्स प्रकार हा अतिशय अवघड आहे. 'घुमर'ची शुटिंग 'पद्मावती'च्या सेटवर पहिल्या दिवशीच झाली होती. पहिल्याच दिवशी राजस्थानी 'घुमर' डांस करण्यापूर्वी मला माझी भूमिकाही नीट समजलेली नव्हती, अशी प्रांजळ कबुलीही दीपिकाने दिली आहे. 
 
तुम्हाला जर 'जुबैदा'मधील करिश्मा कपूर आठवत असेल तर, या फिल्ममध्ये करिश्माने एका गाण्यात पूर्ण 'घुमर' डान्स केला होता. मात्र तुम्हाला 'घुमर' म्हणजे काय हे माहित आहे का, काय आणि कसा असतो हा डान्स? 
 
भरतपूरच्या राज परिवाराचे विश्वेंद्र यांनी सांगितले, की 'घुमर' मध्ये पुरुष कुठेच नसतात. किंबहूना पुरुषांसमोर महिला 'घुमर' डांस करतच नाहीत. एवढेच नाही तर, 'घुमर' डांस हा घुंघटमध्येच केला जातो. मात्र पद्मावतीमध्ये या दोन्ही गोष्टींचे उल्लंघन करण्यात आले आहे. 
 
या पॅकेजमधून जाणून घ्या काय आहे राजस्थानचे लोकनृत्य 'घुमर' 
बातम्या आणखी आहेत...