आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका म्हणाली, \'पद्मावती\' रिलीज होणारच, भंसाळींबरोबर काम करायला मिळणे हे नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'पद्मावती' चित्रपटाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर दीपिका पदुकोणने म्हटले आहे की, हा चित्रपट रिलीज होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ती म्हणाली, आम्ही फक्त सेंसॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत.
 
या चित्रपटाच्या विरोधात गेल्या काही दिवसांत राजपूत समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनाने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात आंदोलन केले आहेत. त्यांची मागणी आहे की, रिलीज होण्यापूर्वी त्यांना हा चित्रपट दाखवायला हवा. दीपिकाने या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका केली आहे. एक डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. 

दीपिका म्हणाली.. ही अभिमानास्पद बाब 
- दीपिका पदुकोणने म्हटले की, मला कधी वाटलेही नव्हते की, मी एक दिवस संजय लीला भंसाळींची हिरोईन बनेल. प्रत्येक अॅक्ट्रेससाठी हा नशिबाचा खेळ असतो. मला याचा आनंद आहे. मी पद्मावती रिलीज होण्याची वाट पाहत आहे. 
- चित्रपट वादातून बाहेर पडेल आणि चित्रपटगृहात प्रदर्शित होईल हे मला माहिती आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी हा चित्रपट मोठे युद्ध जिंकणार आहे. एक महिला असल्याने मला या चित्रपटाचा एक भाग असल्याचा आणि ही कथा सांगण्याचा अभिमान आहे. 
- यापूर्वी दीपिकाने संजय लीला भंसाळी यांच्या रामलीला आणिबाजीराम मस्तानीमध्ये काम केले होते. 
- चित्रपटाचा विरोध करणे योग्य नाही. यातून आपल्याला काय मिळतेय? देश म्हणून आपण कुठे चाललो आहोत? पुढे जाण्याऐवजी आपण मागे जात आहोत? 
- हा वाद फक्त पद्मावतीचा नाही, तर आमची इंडस्ट्री सध्या एक मोठे युद्ध लढत आहे.
 
राजस्थानातील शाही कुटुंबांनी केला विरोध.. 
पद्मावती चित्रपटाच्या विरोधात राजस्थानातील सर्व शाही कुटुंबे एकत्र आली आहेत. चित्रपटात राणी पद्मावती यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचा आरोप, शाही कुटुंबांनी केला आहे. दुसरीकडे करणी सेनाने थिएटर मालकांना पत्र लिहून 'पद्मावती' प्रदर्शित करू नये असे म्हटले आहे. राजस्थानातील वितरकांनी निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत पद्मावती रिलीज केला जाणार नाही. शाही कुटुंबांचे असे म्हणणे आहे की, जोहरची कथा ड्रीम सिक्वेन्सच्या नावाखाली लव्ह स्टोरी म्हणून दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. जर एखाद्या चित्रपटात नरेंद्र मोदींबाबत चुकीचे फॅक्ट दाखवले तर सेंसॉर तो चित्रपट पास करेल का, असा सवालही शाही कुटुंबांनी केला आहे.
 
पुढे वाचा, काय म्हणाली दीपिका पदुकोण...
बातम्या आणखी आहेत...