आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Priyanka Song Pinga From 'Bajirao Mastani' Out

प्रियांका-दीपिकाने एकत्र घातला 'पिंगा...', पाहा Face-Off असलेले गाणे रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पिंगा..'मध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण
मुंबई- 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचे नवीन गाणे 'पिंगा' रिलीज झाले आहे. गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा लावणी डान्स करताना दिसत आहेत. प्रियांकाने पर्पल तर दीपिकाने मरुन रंगाची साडी परिधान केली आहे. दोघी ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. गाण्याचा हाय-लाइट पॉइंट यांचा फेस-ऑफ आहे. दोन्गी अभिनेत्रींना एकाच फ्रेममध्ये डान्स करताना बघणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नाहीये. सिनेमात प्रियांका 'काशीबाई' तर दीपिका 'मस्तानी' लूकमध्ये दिसणार आहे. ('पिंगा'चा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.)
हे गाणे प्रियांकाने टि्वटरवर रिलीज केले आहे. गाण्याची लिंक चाहत्यांना शेअर करून प्रियांकाने टि्वट केले, 'And it's here.. #PINGA #BajiraoMastani #Kashibai #Mastani http://bit.ly/SongPinga what say???'
संजय लीला भन्साळीच्या या सिनेमाचे हे गाणे शनिवारी रात्री (14 नोव्हेंबर) रिलीज झाले. मात्र पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यामुळे गाण्याला रविवारी (15 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता आऊट करण्यात आले आहे. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा स्टारर हा सिनेमा 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमध्ये पाहा 'पिंगा' गाण्यातील दीपिका-प्रियांकाची झलक...