आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दीया और बाती हम 2\'मध्ये दिसणार नाही \'संध्या बींदणी\', ही अॅक्ट्रेस करेल रिप्लेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'दीया और बाती हम'च्या शेवटच्या अॅपिसोडचे शुटिंग नुकतीच उरकण्यात आले. दुसऱ्या सीजनसह ही मालिका पुनरागमन करणार आहे. पण यावेळी संध्या बींदणी (दीपिका सिंह) आणि सूरज राठी (अनस राशिद) यांच्या जागी नवीन चेहरे दिसतील. दीपिका आणि अनस नवीन सीजनमध्ये राहणार नाहीत. इतर स्टार्स नीलू वाघेला (भाभो), कणिका माहेश्वरी (मीनाक्षी) आणि करण गोडवानी (विक्रम) हे कायम राहतील.
वाचा कोण करेस 'संध्या बींदणी'ला रिप्लेस
दीपिकाच्या जागी नीति टेलर लीड रोलमध्ये दिसेल. 'प्यार का बंधन', 'गुलाल', 'ये है आशिकी' आणि 'कैसी ये यारियां' या सिरिअल्समध्ये प्रेक्षकांनी तिला बघितले आहे. काही तेलगू चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. 2015 मध्ये इस्टर्न आय मॅगझिनने तिची निवड सेक्सिअस्ट एशियन न्युकमर म्हणून निवड केली होती. मॅगझिनच्या कव्हर पेजवर ती झळकली होती. अनसचा रोल इक्बाल खानला मिळण्याची शक्यता आहे. शरमन जोशी आणि सोनू सूद यांच्यासोबतही यासंदर्भात चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नीति टेलरचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...