आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Sonakshi Anushka And Others At Iifa 2015 Red Carpet

आयफा पुरस्कार सोहळ्यात क्वीन, हैदरची बाजी, कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वाललम्पूर - विशालभारद्वाजच्या हैदर क्वीन चित्रपटाने आयफा चित्रपट महोत्सवात प्रत्येकी तीन पुरस्कार जिंकून बाजी मारली आहे. कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
एका मध्यमवर्गीय तरुणीची कथा असलेल्या क्वीन चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल कंगनाला हा पुरस्कार मिळाला. कंगनाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास कंगना अनुपस्थित होती. हैदरमध्ये ३४ वर्षीय शाहिदची करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिका राहिली. शाहिदने चित्रपटात संधी दिल्याबद्दल भारद्वाजचे आभार मानून पुरस्कार त्याला समर्पित केला. माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल विशाल भारद्वाजचे खूप मोठे आभार. आज मी इथे त्यांच्यामुळेच उभा आहे,असे शाहिदने मनोगत व्यक्त करताना सांगितले.

दीपिका : वुमन ऑफ इयर
आमिरखान अभिनीत पीकेसाठी राजकुमार हिराणीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. या श्रेणीमध्ये हिराणीने क्वीन, हैदर, टू स्टेट्स आणि हायवेच्या दिग्दर्शकांना मागे टाकले. देशातील धर्मावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटासाठी मी आई-वडिलांचे आभार मानू इच्छितो. सुभाष घई यांच्याप्रमाणे तंत्रज्ञ आणि अभिनेत्यांशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नसल्याचे हिराणीने सांगितले. मल्टिस्टारर हॅपी न्यू इयरमधील भूमिकेसाठी दीपिका पदुकोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. तिला वुमन ऑफ इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीपिकाने जगभरातील महिलांना पुरस्कार समर्पित केला.
आयफा समारंभात सोमवारी ग्रीन कार्पेटवर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने पत्रकारांना अशी पोझ दिली.

अनुरागकडून हिराणीप्रती आदरभाव व्यक्त
त्याआधीशाहिदने बिसमिल गाण्यावर सादरीकरण केले. हैदरमध्ये शाहिदच्या आईची भूमिका करणाऱ्या तब्बूला सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. के.के. मेननला नकारात्मक भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. क्वीनला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कथानकाच्या(बहल,चैताली परमार आणि परवेज शेख) पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारताना अनुराग कश्यपने राजकुमार हिराणीप्रती आदरभाव व्यक्त केला. चित्रपट कसा आकाराला आला कळाले नाही. चित्रीकरण सुरू केले तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते,असे अनुराग म्हणाला.