आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीराव मस्तानी'त दीपिका पदुकोणचा मुघलकालीन लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये मिन्नमा, 'फाइंडिंग फॅनी'मध्ये गोव्यातील अँजी, 'हॅपी न्यू इयर'मध्ये मोहिनी ही मराठी मुलगी आणि 'पिकू'मध्ये बंगाली पिकू अशा वेगवेगळ्या ढंगातील भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण आता मुघलकालीन अवतारामध्ये दिसणार आहे.
संजय भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये ती मस्तानीच्या भूमिकेत दिसणार आहे. मस्तानी ही बुंदेलखंडचे राजे छत्रसाल बुंदेला यांची मुलगी, पण आई रुहानी पार्शियन मुस्लिम होती.
चित्रपटात नक्षीदार शरारा आणि कुर्त्यामध्ये दीपिका दिसणार आहे. डिझायनर अंजू मोदीने दीपिकाचे कॉश्च्यूम बनवले आहेत.
मस्तानीच्या भूमिकेमध्ये असलेल्या दीपिकाच्या कपड्यात लहंगा, शरारा आणि दुपट्टा यांचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटातील एका भागामध्ये पेशवा राणीप्रमाणे तिचा लूक असणार आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री होती, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूच्या धक्क्याने तिचे निधन झाले होते.