आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिलवाले'सोबत होणार 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाची टक्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा चित्रपटाच्या निमित्ताने आमने- सामने येणार आहेत. येत्या १८ डिसेंबर रोजी किंग खानचा "दिलवाले', तर भन्साळी यांचा "बाजीराव- मस्तानी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडमध्ये एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. सणाच्या दिवशी अनेकांना आपला चित्रपट प्रदर्शित करायचा असतो. त्यामुळे याचा फटका निर्मात्यांना बसत आहे. मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचे बहुतांश चित्रपट हे ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होतात, तर शाहरुख आणि सलमान यांचे चित्रपट हे दिवाळी आणि ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतात. यंदा ईदला सलमान खानचा "बजरंगी भाईजान' हा िचत्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, शाहरुख आणि भन्साळी यांच्या "दिलवाले' आणि "बाजीराव मस्तानी'मध्ये टक्कर पाहायला मिळू शकते. याआधी २००७ मध्ये भन्साळींचा "सावरिया' आणि शाहरुखचा "ओम शांती ओम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे यंदा या
दोघांच्या चित्रपटांतून कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मोठ्या बॅनरचे चित्रपट
याआधीही बॉलीवूडमध्ये मोठ्या बॅनरचे दोन किंवा तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. २००७ मध्ये "सावरिया' समोर शाहरुखचा "ओम शांती ओम' हा चित्रपट होता, तर दोन वर्षांपूर्वी अजय देवगणच्या "सन ऑफ सरदार'ला किंग खानच्या "जब तक है जान'ने आव्हान दिले होते. दरम्यान, शाहरुख खानचे चित्रपट इतर चित्रपटांचे नुकसान करत असल्याचे अनेक निर्मात्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...