आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Belly Actress Poorna Jagannathan Was Sexual Violence Victim In Childhood

डेल्ही बेल्लीची अभिनेत्री म्हणाली, \'वयाच्या 9व्या वर्षीपासून अनेकदा झाले लैंगिक शोषण\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बॉलिवूड सिनेमा 'डेल्ही बेल्ली'मधील अभिनेत्री आणि निर्माती पूर्णा जगन्नाथनने खळबळजनक खुलासा केला आहे, तिचे अनेकदा लैंगिक शोषण झाल्याची आपबीती तिने सांगितले आहे. अभिनेत्री पूर्णा जगन्नाथनने सांगितले, 'वयाच्या 9व्या वर्षांपासून ते तारुण्यात येईपर्यंत अनेकदा मी लैंगिक शोषणाला बळी पडले आहे.' वर्ल्ड बँकच्या वीवोल्वसोबत एक सीरिजतंर्गत शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पूर्णाने एक इमोशनल आणि पॉवरफुल भाषणात स्वत:वर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितले आहे.
बालपणीच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पूर्णाने सांगितले, की माझे बालपण एखाद्या कथेप्रमाणे होते. त्यात अनेक चढ-उतार आले होते.
वडिलांच्या नशेची सवय लपून ठेवण्यास सांगितली जात होती-
पूर्णाने सांगितले, 'माझे वडील दारू पित होते, कुटुंबात आम्हाला सांगण्यात आले होते, की याविषयी कुणालाच काही सांगायचे नाही. मी नऊ वर्षांची असताना लैंगिक शोषणाला बळी पडले. आमच्या शेजारी एक मुलगा राहत होता, तो आमचा फॅमिली फ्रेंडसुध्दा होता, त्याने माझे लैंगिक शोषण केले होते. त्याने मला ताकिद दिली होती, की याविषयी कुणाला काही सांगायचे नाही. बालपणापासून तरुण होईपर्यंत मी अशा अनेक घटनांनांच सामना केला. काही घटना इतक्या वाईट आणि हिंसक होत्या, की मी त्याविषयी बोलूसुध्दा शकत नाही. आमच्या घरात अशा घटनांविषयी बोलण्यास मनाई होती.'
दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करणे भीतीदायक-
अभिनेत्रीपासून निर्माती झालेल्या पूर्णाने सांगितले, की दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करणे भयावह अनुभव होता. पूर्णाने दिल्ली सामूहिक बलात्कारावर 'निर्भया' नाटकाची निर्मित केली होती. येल फायबेरच्या या नाटकाला 2013मध्ये एमनेस्टी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला होता. आता अनेक अभिनेत्री स्वत:वर झालेल्या लैंगिक शोषणाविषयी मनमोकळ्यापणाने बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्कि कोचलिन, दीपिका पदुकोण आणि सोमी अली यांनीसुध्दा स्वत:वर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सलमानची पूर्वाश्रमी प्रेयसी सोमी अली म्हणाली, वयाच्या 5व्या वर्षी झाले होते लैंगिक शोषण...