आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Government Wrote To 4 Bollywood Actors\' Wives To Refrain Their Husbands From Endorsing Pan Masala

शाहरुखने \'पान मसाला\'ची जाहिरात करू नये; दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी खानसोबत शाहरुख (फाइल फोटो) - Divya Marathi
गौरी खानसोबत शाहरुख (फाइल फोटो)
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल सरकारने पान मसालाचे प्रमोशन करणा-या बॉलिवूड सेलेब्सना थांबवण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. दिल्ली सरकारने शाहरुख, अजय देवगण, अरबाज खान आणि गोविंदा यांच्या पत्नीला एक-एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये या कलाकारांच्या पत्नीला अपील करण्यात आले आहे, की त्यांनी आपल्या पतीला पान मसाल्याच्या जाहिराती करण्यास थांबवावे, कारण यापासून कर्करोग होतो.
अशा जाहिराती करण्यास अडवा...
- शाहरुख आणि इतर तीन स्टार्सच्या पत्नींना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकारने अपीलचे कारण सांगितले आहे.
- शाहरुखची पत्नी गौरीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, 'आम्ही अपील करतो, की तुम्ही शाहरुखला पान मसालाच्या जाहिराती करण्यास नकार द्यावा. पान मसाला पान मसाला बनवण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर होतो, त्यापासून कर्करोग होतो.'
- पत्रात पुढे म्हटले, 'आम्ही शाहरुख आणि इतर स्टार्सना यापूर्वीसुध्दा पत्र लिहिले होते. त्यामध्येसुध्दा अपील केले होते, की त्यांनी पान मसाल्याचे पदार्थ प्रमोट करू नये. परंतु अद्याप त्यांचे उत्तर मिळाले नाही.'
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सनी लिओनलासुध्दा पाठवले पत्र...