आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजमागे असे असते कलाकारांचे Life, बघा Behind the stage Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः रामलीलाच्या माध्यमातून असत्यावरचा सत्याचा विजय दाखवला जातो. मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात विजयादशमी साजरी करण्यात आली. या खास दिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावर 'लव कुश रामलीला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामलीलामध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले होते. अभिनेता अजय देवगणचा सहभाग...
- मंगळवारी विजयदशमीच्या निमित्ताने आयोजित 'लव कुश रामलीला' कार्यक्रमात अभिनेता अजय देवगण आणि अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते.
- रामलीला कमेटीने दोघांचे स्वागत केले. अजय देवगण आणि केजरीवाल यांनी बाण सोडून रावणाचे दहन केले.
- 'लवकुश रामलीला'व्यतिरिक्त दिल्लीत अनेक रामलीला कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यामध्ये बॉलिवूड कलाकार सहभागी होत असतात.
- रामलीलामधील अनेक स्टंट्स हे कलाकार स्वतः करत असतात.

यंदा नवीन तंत्रज्ञानाचा वापर..
- यावेळी 'लव-कुश रामलीला'मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
- राम-रावण युद्ध यावेळी जमीनीपासून 250 फूट उंचावर दाखवण्यात आले. यावेळी शिरच्छेद झाल्यानंतर जमीनीवर परसलेले रक्त दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
- तर राक्षसांसाठी स्पेशल ब्लॅक ड्रेस बनवण्यात आले होते. रामलीलामध्ये स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्यात आला होता.

काय आहे लव-कुश रामलीलाचा इतिहास
- 1988 मध्ये पहिल्यांदा 'लव-कुश रामलीला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी उपस्थित होते.
- रामायणचे दिग्दर्शक रामानंद सागर या मंचावर आले होते. त्यांनी येथे लोकांना रामकथा सांगितल्या होत्या.
- या रामलीलाचे प्रक्षेपण दिल्लीत स्थानिक टीव्ही केबलच्या माध्यमातून झाले होते. शिवाय रामलीलाच्या वेबसाइट आणि सोशल साइट्सच्या माध्यमातूनसुद्धा लाइव्ह प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, दिल्लीत झालेल्या रामलीला कार्यक्रमांमधील Behind the stage Photos सोबतच लव-कुश रामलीलाचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...