आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आले \'बीबर\'च्या मना.. केरळहून आलेल्या मसाजर असतील दिमतीला, यादी वाचून व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २३ वर्षांचा कॅनेडियन पाॅप स्टार जस्टिन बीबर पहिल्यांदा भारतात येत आहे. १० मे रोजी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा कार्यक्रम आहे. बीबरच्या टीमने आयोजकांपुढे मागण्यांची मोठी यादी ठेवली आहे. त्यात अनेक रंजक गोष्टींचा समावेश आहे.  
 
टीमने म्हटले आहे की, बीबरसाठी दोन पंचतारांकित हॉटेल्स बुक कराव्यात. त्याची टीम १३ खोल्यांत राहील. बीबरसाठी रोल्स रॉइस कार व ताफ्यासाठी १० सेडान कार,२ व्हॉल्वो बस द्याव्यात. २४ तास सुरक्षेसाठी झेड प्लस सिक्युरिटी टीम तैनात असावी. ८ खासगी सुरक्षा रक्षकही सोबत असतील. बीबरने आयोजकांना सांगितले आहे की, तो कुणालाही ऑटोग्राफ देणार नाही. बीबरसोबत त्याचे कुटुंब व टीमचे सुमारे १२० लोक भारतात येतील. बीबर ९ मे रोजी दुबईतील कार्यक्रम आटोपून थेट मुंबईला येईल. त्यासाठी आयोजकांनी एक खासगी जेट विमान बुक करावे. कॉन्सर्टसाठी हाॅटेल ते स्टेडियमपर्यंत बीबर रस्ता नव्हे हेलिकॉप्टरने जाईल. त्याचे हॉटेल हे खासगी व्हिलासारखे बनवावे. खोल्या पुन्हा डिझाइन कराव्या. त्यात मुघल पेंटिंग्ज व काश्मिरी बेडशीट्स असाव्या. बीबरच्या खोलीचे पडदे सफेद व जांभळ्या रंगाचे असावे.  
 
बीबरला योग व मसाज आवडतो. त्यासाठी त्याला खास भारतीय योग बॉक्स द्यावा. त्यात चमेली, मोगरा, जाई, गुलाबाचे तेल असेल. केरळहून आयुर्वेदिक मसाजर येतील. बीबरच्या जेवणात पाच प्रकारच्या डिशेस असतील. त्याच्या खोलीत २४ पाण्याच्या बाटल्या, ४ एनर्जी ड्रिक, ६ व्हिटामिनच्या बाटल्या, ६ क्रीम सोडा व अनेक प्रकारच्या फळांचे रस ठेवावे. काचेच्या फ्रिजमध्ये नारळपाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, सेंद्रिय मध व केळी आणि हर्बल चहा ठेवावा. त्याच्या जवळपास लिलीची फुले नको. बीबर आपल्यासोबत १० कंटेनर भरून सामान आणेल. त्यात त्याचा सोफासेट, प्ले स्टेशन, वॉशिंग मशीन, फ्रिज, वॉर्डरोब, टेबल टेनिसचा टेबल आदी सामान असेल. 
 
बीबरची एकूण कमाई आहे १२८४ कोटी रुपये 
सेलिब्रिटी नेटवर्थनुसार २०१५ मध्ये बीबरचे एकूण उत्पन्न १२८४ कोटी रुपये होते. त्याची वार्षिक कमाई ५२ ते ६० काेटी रुपये आहे. त्याची लोकप्रियता इतकी आहे की २०१५ मध्ये एकाच आठवड्यात त्याच्या ‘पर्पस’ अल्बमच्या १ कोटी प्रति विकल्या गेल्या. २०१२ मधील त्याचा ‘माय वर्ड - २.०’अल्बम  ४३ कोटींत विकला गेला. तो राहत असलेल्या घराचे दरमहा भाडे २३ लाख रुपये आहे.
 
कडक सुरक्षा व्यवस्था.. 
जस्टीन बीबरचा सुमारे 120 जणांचा संच भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यासाठी 10 लक्झरी सेडान कार आणि 2 व्हॉल्व्हो बस हे लोक भारतात असेपर्यंत त्यांच्या दिमतीला असतील. तर जस्टीनसाठी रोल्स रॉयसची व्यवस्था केली आहे. सुरक्षा पुरवण्यात जगात आठवा क्रमांक असलेल्या कंपनीने खास झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असलेल्या कार त्यांना पुरवल्या आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, जस्टीन बीबरला कोणत्या सुविधा मिळणार..
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...