एन्टरटेन्मेंट डेस्कः अनुराग कश्यपची निर्मिती असलेला \'उडता पंजाब\' हा सिनेमा सेन्सॉरच्या तावडीत सापडला होता. मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने सिनेमाला एक कटसह रिलीजची मंजुरी दिली आणि पुढच्या 48 तासांत सिनेमाला नवे A सर्टिफिकेट देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला 13 कट्स सांगितले होते. त्यामुळे नाराज निर्मात्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
एखाद्या सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आले म्हणजे मुळ सिनेमात नेमके काय बदल करण्यात आले हे प्रेक्षकांना ब-याचदा ठाऊक ठाऊक नसतं. जेव्हा आपण थिएटरमध्ये एखादा सिनेमा बघायला जाता, तेव्हा सिनेमा सुरु होण्यापूर्वी पडद्यावर सेन्सॉर बोर्डाचे एक सर्टिफिकेट दाखवण्यात येते. थिएटरमध्ये उपस्थित अनेकांचे लक्ष या सर्टिफिकेटवर जात नाही आणि जे लोक हे सर्टिफिकेट बघतात, त्यांना यामधील मजकूर लक्षात येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सर्टिफिकेट विषयीच्या अशा अनेक गोष्टी सांगत आहोत, ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. या सर्टिफिकेटवर सिनेमाविषयीच्या अनेक गोष्टी नमूद केलेल्या असतात.
कोणत्या आहेत या गोष्टी, सर्टिफिकेटवर दिसणा-या वी/अ किंवा V/U या शब्दांचा काय अर्थ असतो, यासह अनेक गोष्टी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर....