Home »News» Dev Anand To Aarti Agarwal Celebs Die Due To Heart Attack, Dev Anand Death Anniversary

देव आनंदपासून ते प्रभासच्या हिरोईनपर्यंत, हार्ट अॅटकने झाले या 16 सेलिब्रिटींचे निधन

दिव्य मराठी वेब टीम | Dec 04, 2017, 10:59 AM IST

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांची 3 डिसेंबर रोजी सहावी पुण्यतिथी होती. 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या 88 वर्षी लंडनमधील वॉशिंग्टन मेफेयर हॉटेलच्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. डॉक्टरांनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. देव आनंद यांचे खरे नाव धरम देव पिशोरीमल आनंद असे होते. त्यांचे वडील एक वकील होते. देव साहेबांनी सिनेसृष्टीला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. ते केवळ एक सशक्त अभिनेतेच नव्हते तर खासगी आयुष्य मनमौजी स्वभावाने जगणारे व्यक्ती होते.


वयाच्या 31 व्या वर्षी झाले साऊथ अॅक्ट्रेस आरती अग्रवालचे निधन...
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री आरती अग्रवालचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. वयाच्या 31 व्या वर्षी 6 जून 2015 रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिने बॉलिवूडमध्ये 'पागलपन' (2001) आणि साऊथमध्ये 'नुव्वु नाकु नाचव' (2001) या चित्रपटांमधून डेब्यू केले होते. याशिवाय आरतीने 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबतही काम केले होते. 2009 मध्ये आलेला 'पोसनी जेंटलमन' हा आरतीचा शेवटचा चित्रपट ठरला.


अभिनेते देव आनंद, अभिनेत्री आरती अग्रवाल यांचेच नव्हे, तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही सेलिब्रिटींविषयी...

Next Article

Recommended