आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Devgan Onscreen Daughter Ishita Dutta Secret Marriage With Her Bollywood Actor In Temple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय देवगणच्या ऑनस्क्रिन मुलीने केले गुपचुप लग्न; बहीण गैरहजर, काजोलसह हे सेलेब्स पोहोचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशिता दत्ताच्या लग्नाल अजय देवगण आणि काजोल आवर्जुन उपस्थित होते. - Divya Marathi
इशिता दत्ताच्या लग्नाल अजय देवगण आणि काजोल आवर्जुन उपस्थित होते.

मुंबई - अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी इशिता दत्ता बद्दलची अशी बातमी आहे, की 28 नोव्हेंबरला इशिताने गुपचुप लग्न केले आहे. विशेष म्हणजे इशिताची कपिल शर्मासोबतची अपकमिंग फिल्म 'फिरंगी' लवकरच रिलीज होणार आहे. त्याआधीच इशिताने तिचा सो-कॉल्ड बॉयफ्रेंड अँड अॅक्टर वत्सल सेठसोबत गुपचुप लग्न करुन घेतले आहे. मुंबईतील जुहू येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस मंदिरात इशिता आणि वत्सल विवाहबंधनात अडकले. या लग्नाला मोजकेच लोक निमंत्रित केले गेले होते. त्यात प्रामुख्याने अजय देवगण, बॉबी देओलसह बॉलिवूड आणि टॉलिवूडचे निवडक स्टार्स सहभागी झाले होते.

 

- इशिताला 'दृष्यम'मधून (2012) मधून ओळख मिळाली होती. 'दृष्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची (अनु साळगावकर) भूमिका केली होती. 
- झारखंडमधील जमशेदपूरची इशिताने साउथ इंडियन फिल्ममध्येही काम केले आहे. 
- टीव्ही सीरियल 'रिश्तों का सौदागर- बाजीगर' मध्ये इशिता लीड रोलमध्ये होती. यामध्ये तिच्यासोबत होता 'टार्जन द वंडर कार' फेम वत्सल सेठ होता. वत्ससोबतच इशिताने साता जन्माची गाठ बांधली आहे.

- इशिताची बहिण अॅक्ट्रेस तनुश्री दत्ता विदेशात असल्यामुळे ती ऐनवेळी लग्नाला येऊ शकली नाही, अशी माहिती आहे. 

 

तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे इशिता
- इशिता दत्ता बॉलिवूड अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताची धाकटी बहिण आहे. 
- इशिताचे प्राथमिक शिक्षण जमशेदपूरमधील डीबीएम स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली होती. 
- इशिताला ट्रॅव्हलिंग आणि कुकुंगची आवड आहे. याशिवाय तिला वाचनाचीही आवड आहे.

 

अनुपम खेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतली अॅक्टिंगची ट्रेनिंग
- 12 वी पर्यंत जमशेदपूर येथे शिक्षण झाल्यानंतर इशिता मुंबईत बहिणीकडे आली. 
- येथे तिने सोपाया कॉलेजमधून मास कम्यूनिकेशनमध्ये ग्रॅज्यूएशन केले. 
- त्यानंतर अॅक्टिंगकडे मोर्चा वळवला, त्यासाठी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इशिता-वत्सल सेठ यांच्या लग्नाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...