आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या हृदयात वेदना, रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांना 27 मे रोजी अशक्तपणा आणि हृदयात वेदना होत असल्याची माहिती मिळाली आहे.धमेंद्र यांना नेमका कोणता त्रास होतोय, हे अद्याप समजू शकले नाही.

धर्मेंद्र हे 79 वर्षांचे असून मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. त्यांना बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून सुध्दा ओळखले जाते.
पाच वर्षांपूर्वीसुध्दा झाला होता त्रास
पाच वर्षापूर्वी धर्मेंद्र यांना याच आजाराने चंदीगढमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना सतत अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.