आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र B'DAY : ही आहे सनी-बॉबीची आई, हेमासोबत लग्न करण्यासाठी स्वीकारला हा धर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र यांनी 19 व्या वर्षी प्रकाशकौर यांच्यासोबत विवाह केला होता. - Divya Marathi
धर्मेंद्र यांनी 19 व्या वर्षी प्रकाशकौर यांच्यासोबत विवाह केला होता.

धर्मेंद्र आज (8 डिसेंबर) त्यांच्या 82वा वाढदिवस साजरा करत आहेत. याही वयात धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. लवकरच त्यांचा 'यमला पगला दिवान 3' सिनेमा येणार आहे. धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली होती. त्यांचा पहिला विवाह प्रकाश कौर यांच्यासोबत 1954 मध्ये झाला. तेव्हा धर्मेंद्र 19 वर्षांचे होते. त्यांनी दुसरा विवाह बॉलिवूडची ड्रिम गर्ल अर्थात हेमा मालिनी यांच्यासोबत केला. त्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. 

 

- धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचे शिक्षण फगवाडा येथील आर्य हायस्कूलमध्ये झाले. 

- धर्मेंद्र यांनी सर्वप्रकारचे रोल केले आहेत, तेही त्यांच्या उमेदीच्या काळात मग 'सत्यकाम'मधील साधा सरळ हिरो असेल नाही तर 'शोले' मधील अॅक्शन हिरो किंवा 'चुपके-चुपके' मधील कॉमेडियन. 

- धर्मेंद्र यांचे शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झाले आहे. सुरुवातीपासून त्यांना चित्रपटांची आवड होती. चित्रपटात येण्यापूर्वी धर्मेंद्र रेल्वेमध्ये क्लर्क होते, तेव्हा त्यांचा पगार साधारण सव्वाशे रुपये होता. 

- चित्रपटांच्या आवडीमुळेच त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला आणि अर्जुन हिंगोरानी यांना धर्मेंद्र पसंत पडले. हिंगोरानी यांनी 'दिल भी तेरा हम भी तेरे'साठी अवघ्या 51 रुपयांमध्ये त्यांना साइन केले होते. डेब्यू फिल्ममधून धर्मेंद्र यांना फार काही ओळख मिळवता आली नाही. मात्र त्यानंतरची संघर्षाची काही वर्षे गेल्यानंतर 60च्या दशकात त्यांना यश मिळाले, अनपढ़ (1962), बंदिनी (1963) तसेच सूरत और सीरत (1963)  मधून लोक धर्मेंद्र यांना ओळखायला लागले. 1966 मध्ये प्रदर्शित 'फूल और पत्थर'ने धर्मेंद्र यांना स्टार बनवले. संघर्षाच्या काळात धर्मेंद्र जुहू येथे एका छोट्या रुममध्ये राहात होते. 

- धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाशकौरपासून सनी, बॉबी ही दोन मुलं आणि विजेता आणि अजीता या दोन मुली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये, चार मुली आहेत धर्मेंद्र यांना... धर्मेंद्र यांचे फॅमिली Photos.. 

बातम्या आणखी आहेत...