आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : आजी-आजोबा झाले धर्मेंद्र-हेमा मालिनी, मुलगी अहानाने दिला मुलाला जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धर्मेंद्र आणि हेमामालिनी)
मुंबईः ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमामालिनी आजी-आजोबा झाले आहेत. त्यांची धाकटी मुलगी अहाना देओलने मुलाला जन्म दिला आहे. स्वतः हेमा यांनी ही आनंदाची बातमी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दिली. त्यांनी लिहिले, "Thk u all for ur good wishes. Yes Ahaana has delivered a baby boy & we are all so thrilled! Mother & baba are fine!"
हेमामालिनी पहिल्यांदाच आजी झाल्या आहेत. त्यांची थोरली मुलगी ईशाचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले, मात्र अद्याप तिला बाळ झालेले नाही.
मार्च महिन्यात झाले होते डोहाळे जेवण
अहानाचे गेल्यावर्षी म्हणजे 2 फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरा याच्याशी विवाह झाला. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आणि प्रमूख व्यावसायिकांच्या उपस्थितीत त्यावेळी मुंबईत धमाकेदार पार्टी झाली होती.
दोन महिन्यांपूर्वीच (मार्च महिन्यात) अहानाची थोरली बहीण ईशाने अहानाचे डोहाळे जेवण केले होते. या कार्यक्रमाची छायाचित्रे तिने सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली होती.
धर्मेंद्र-हेमा यांच्या नातवाची छायाचित्रे अद्याप मीडियात आलेली नाहीत. मात्र अहानाच्या डोहाळे जेवणाची छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...