Home »News» Dharmendra-Jitendra And Other Celebs At Mohan Kumar Prayers Meet

धर्मेंद्र, जितेंद्र, प्रेम चोप्रासह हे कलाकार पोहोचले शोकसभेत, दिग्दर्शक मित्राला वाहिली श्रद्धांजली

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 13:50 PM IST

  • डायरेक्टर मोहन कुमार यांच्या प्रेअर मीटमध्ये पोहोचले धर्मेंद्र, जितेंद्र आणि अन्य पाहुणे
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मोहन कुमार यांचे 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी राजेश खन्ना स्टारर 'अवतार' (1983) सह अनेक गाजलेले चित्रपट बनवले होते. सोमवारी जुहूस्थित इस्कॉन मंदिरात त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मेन्द्र, राकेश रोशन, सोनू निगम, भूषण कुमार, जितेंद्र, रमेश तौरानी, सचिन पिळगावकर, अंजना मुमताज, शुभा खोटे, भावना बलसावर, दीपक पाराशर, अनिल धवन, मुकेश ऋषी यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
- जून, 1934 साली सियालकोट (पाकिस्तान) येथे जन्मलेले मोहन कुमार यांनी 1961 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. येथूनच त्यांनी फिल्ममेकर म्हणून करिअर सुरु केले होते.
- मोहन कुमार यांनी सायरा बानो, धर्मेंद्र आणि राजकुमार यांच्यासोबत मिळून 'आई मिलन की बेला' हा चित्रपट बनवला होता. याशिवाय आस का पंछी (1961), आप की परछाइयां (1964), अमीर-गरीब (1974), अमृत (1986) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.
- त्यांचा 'मोम की गुडिया' (1972) हा चित्रपट तुफान गाजला होता. 1990 साली आलेला 'अम्बा' हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, दिग्दर्शक मोहन कुमार यांच्या प्रेअर मीटमध्ये पोहोचलेल्या कलाकारांचे PHOTOS...

Next Article

Recommended