आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवाला या अंदाजात भेटले धर्मेंद्र, समोर आले छायाचित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या नातवाचे लाड करताना अभिनेते धर्मेंद्र)
मुंबईः बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी रविवारी आपल्या नातवाची भेट घेतली. डेरियन वोहरा असे त्यांच्या नातावाचे नाव ठेवण्यात आले आहे. धर्मेंद्र यांची थोरली मुलगी ईशाने आपल्या ट्विटर अकाउंटवर हे खास छायाचित्र अपलोड केले आहे. यामध्ये धर्मेंद्र नातवाचे लाड करताना दिसत आहेत. ईशाने या छायाचित्रासह ट्विट केले, " Darien vohra showers love to his grandfather with arms wide open! By the way check out his dhai kilo ka haath". छायाचित्रात चिमुकला डेरियन त्याचे वडील वैभव वोहराच्या हातात असून धर्मेंद्र त्याचे चुंबन घेताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी ट्विटरच्या माध्यमातून धाकटी मुलगी अहानाने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी ट्विट केले होते, "Thk u all for ur good wishes. Yes Ahaana has delivered a baby boy & we are all so thrilled! Mother & baba are fine!"
पहिल्यांदाच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र आजी-आजोबा झाले आहेत. त्यांची थोरली मुलगी ईशाच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप तिला मुलं झालेले नाही.
नोटः डेरियन (Darien) हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ देवाने दिलेले असा होतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी केलेले ट्विट...