आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोपिकसाठी धर्मेंद्र यांची सलमान खानला पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फाइल फोटो : धर्मेंद्र आणि सलमान खान)

हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे धर्मेंद्र यांची अॅक्शन हीरो म्हणून ओळख आहे. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी आतापर्यंत २४७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ज्यावेळी त्यांच्या बायोपिकचा विषय निघतो तेव्हा आपली भूमिका मुलगा सनी देओलने न साकारता सलमानने साकारावी, असे त्यांना वाटते.
जुलैला प्रदर्शित होत असलेल्या 'सेकेंड हँड हसबंड' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान त्यांनी बायोपिकबाबत पुनरुच्चार केला. धर्मेंद्र यांनी सांगितले की, 'जर माझा बायोपिक बनला तर त्यामध्ये माझी भूमिका सलमानच अचूकरीत्या साकारू शकतो. कारण आमच्या दोघांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व एकसारखे आहे. फिटनेसमध्ये देखील तो माझ्याप्रमाणेच आहे. त्यामुळे तोच माझ्या भूमिकेला न्याय देऊ शकतो.'
आमच्या दोघांची फार कमी वेळा भेट होते, पण जेव्हा आम्ही भेटतो त्यावेळी दोघे मनमोकळेपणाने संवाद साधतो, असे धर्मेंद्र यांनी सांगितले. धर्मेंद्र यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आधीच इंडस्ट्रीत बायोपिकसाठी येत असलेल्या नवनवीन नावामध्ये आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...