आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिँचॅक पुजाचे \'कथप्पा\' कनेक्शन, यूट्यूबवरील व्हिडिओ झाले गायब, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  'सेल्फी मैंने ले ली आज' आणि 'स्वॅगवाली टोपी' अशी विचित्र आणि बेसूर आवाजातील गाण्यांमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली तरुणी ढिँचॅक पुजाचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरून गायब झाले आहेत. पुजाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून यूट्यूबने हे व्हिडिओ हटवले आहेत. कॉपीराईटची तक्रार आल्याने हे व्हिडीओ हटवले असल्याची माहिती मिळत आहे.
 
कथप्पाची लिंक..
कथप्पा सिंग नावाच्या एका व्यक्तीने ढिंचॅक पुजाच्या 'सेल्फी मैने लेली आज' सह काही गाण्यांच्या कॉपीराईटबाबत तक्रार केल्यामुळे तिची गाणी यूट्यूबवरून हटवली असल्याचे काही मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. 
 
1.8 लाख लोकांनी केले होते सबस्क्राइब 
- काही दिवसांपूर्वी व्हिडीओ शेयरिंग बेवसाईट यूट्यूबवर एका तरुणीचे व्हिडीओ एवढे व्हायरल झाले होते की, 1.8 लाख लोकांनी ते सबस्क्राइब केले होते. 
- तिच्या 'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्याला 30 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. 
- व्हायरल झाल्यानंतर या गाण्याची खिल्लीही उडवण्यात आली होती. 
- 'दिलों का स्कूटर' गाण्यानंतर ढिँचॅक पुजाच्या विरोधात विना हेल्मेट गाडी चालवल्याने तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. 
 
कॉपीराइटचे प्रकरण.. 
कॉपीराइटच्या दाव्यामुळे यू ट्यूबने हे व्हि़डिओ हटवले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तपासानंतर हे व्हिडिओ पुन्हा अपलोड केले जाणार का याचा निर्णय होईल. सध्या ढिँचॅक पुजाच्या यूट्यूब अकाऊंटवर फक्त 'दिलों का स्कूटर' हा एकच व्हिडिओ आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, यू ट्यबचे काही स्क्रीनशॉट आणि पुजाची खिल्ली उडवणाऱ्या व्हायरल पोस्ट...
 
बातम्या आणखी आहेत...