मुंबईः सरबजीत सिंह यांच्या आयुष्यावर आधारित 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुड्डा यांच्या दमदार अभिनयाची झलक बघायला मिळत असून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. ट्रेलरमध्ये या कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांचे संवादही लक्षवेधी ठरत आहेत. एक नजर टाकुयात ट्रेलरमधील काही दमदार डायलॉग्सवर...