Home | News | diana penty and john abharam work together in movie

जॉन अब्राहमसोबत अॅक्शन ड्रामामध्ये दिसून येणार डायना पेंटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 07, 2017, 03:57 PM IST

अभिनेत्री डायना पेंटी लवकरच जॉन अब्राहमसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. जॉनने त्याच्या होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या चित्रपटासाठी डायनाला विचारले आहे

 • diana penty and john abharam work together in movie
  मुंबई - अभिनेत्री डायना पेंटी लवकरच जॉन अब्राहमसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. जॉनने त्याच्या होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या चित्रपटासाठी डायनाला विचारले आहे. या चित्रपटाचे नाव 'शांतिवन' असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट भारताद्वारे केलेल्या पोखरण परमाणु परिक्षणवर आधारलेला असणार आहे. डायनाने स्वतः या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.
  पुढच्या स्लाईडवर वाचा, काय म्हटली डायना पेटी...

 • diana penty and john abharam work together in movie
  अभिनेत्री डायना पेंटी
  डायना म्हटली, "स्क्रिप्ट वाचल्यानंतर लगेचच मी हा चित्रपट साईन केला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. परमाणु 
  परिक्षण म्हणजे काय हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. हा चित्रपट माझा पहिलाच अॅक्शन ड्रामा चित्रपट असेल. 'नीरजा' चित्रपटाच्या कथालेखकाने या चित्रपटाची कथा लिहीलेली आहे. 30 मे पर्यंत हा चित्रपट फ्लोरवर येईल."
   
   
  पुढच्या स्लाईडवर, 'हॅपी भाग जायेगी पार्ट 2' मध्ये डायना पेटीं..
   
 • diana penty and john abharam work together in movie
  'हॅपी भाग जायेगी' चित्रपटातील एक दृश्य
  'हॅप्पी भाग जायेगी'च्या दुसऱ्या भागातही आहे डायना पेंटी 
  'हॅप्पी भाग जायेगी' चित्रपटाचा दुसरा भागही बनणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी डायनाचे नाव 
  निश्चित करण्यात आले आहे. डायनाचा पुढील चित्रपट 'लखनऊ सेंट्रल' आहे, फरहान अख्तर, मनोज तिवारी आणि गिप्पी 
  गरेवाल या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार आहेत. 

Trending