आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारली, पण धोका अजूनही कायम, पत्नीने पोस्ट केला फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कुमारयांचा हा फोटो ऋषी कपूर यांनी पोस्ट केला. त्यात दिलीप यांच्यासोबत पत्नी सायरा बानोसुध्दा दिसत आहे. - Divya Marathi
दिलीप कुमारयांचा हा फोटो ऋषी कपूर यांनी पोस्ट केला. त्यात दिलीप यांच्यासोबत पत्नी सायरा बानोसुध्दा दिसत आहे.
मुंबई: रविवारी अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीत सुधार असल्याचे सांगण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. दिलीप यांची पत्नी सायरा बानो यांनी टि्वटरवर त्यांचा एक फोटो आणि एक स्टेटमेंट पोस्ट केले आहे. दिलीप यांचे वय 93 वर्षे आहे. त्यांना शुक्रवारी (15 एप्रिल) मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले होते.
काय म्हणाल्या सायरा बानो...
- सायरा बानो म्हणाल्या, की दिलीप साहेबांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. ते रिकव्हर होत आहेत. काही माध्यमांत ते आयसीयूमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत, ते योग्य नाही.
- सायरा पुढे म्हणाल्या, की शुक्रवारी (15 एप्रिल) रात्री दिलीप साहेब यांना ताप आल्याने अॅडमिट करण्यात आले होते. त्यांना आयव्हीव्दारे इंजेक्शन देण्यात आले.
काय झाले होते?
- टीव्ही चॅनलनुसार, कुमार यांना निमोनिया झाला होता. शुक्रवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रात्री उशीरा म्हणजे 12 वाजता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- शनिवारी सकाळी जवळपास 10 वाजता रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले, की दिलीपसाहेबांना ICUमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
डिसेंबरमध्ये पद्मविभूषणने गौरवले....
- गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डिसेंबरमध्ये गतकाळातील अभिनेते दिलीप कुमार यांनी घरी जाऊन पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते.
- यावेळी त्यांची पत्नी सायरा बानो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
- दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण देण्याची घोषणा सरकारने केली होती.
- त्यानंतर एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात दिलीप कुमार उपस्थित राहू शकले नव्हते.
- त्यामुळे सरकारने त्यांना घरी जाऊन हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला होता.
या सिनेमांत केल्या मुख्य भूमिका...
- दिलीप कुमार यांना 'मुगल-ए-आजम’, 'नया दौर’, 'देवदास’, 'मधुमति’, 'गंगा-जमुना’, 'आजाद’, 'लीडर’ आणि 'मशाल’सारख्या सिनेमांसाठी ओळखले जाते.
- त्यांना 1991मध्ये पद्मभूषण आणि 1994मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...